कोल्हापुरातल्या राधानगरी एसटी चालकांवर पुष्पवृष्टी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, May 28, 2020

कोल्हापुरातल्या राधानगरी एसटी चालकांवर पुष्पवृष्टी
निरंजन पाटील : मिरर वृत्तसेवा कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी एस.टी.डेपोच्या वतीने करोना संकट कालावधीत लाल परीतून परप्रांतीयांना सेवा देणाऱ्या चालकांच्यावर पुष्पवृष्टी  करण्यात आला.राधानगरी डेपोतील चोवीस चालक मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे मुंबई मधील मजूर घेऊन गेले होते.चार दिवसाचा धाडशी व सुरक्षित प्रवास करून  आल्याबद्धल राधानगरी डेपोत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले .
 राधानगरी आगारातील चालकांना राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कामगिरीवर जाण्यासाठी प्रोत्साहीत  करण्याच्या कामी राधानगरी आगर व्यवस्थापक सागर पाटील यांना जिल्ह्याचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे ववाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले राधानगरी आगारचे 24 चालक लाल परी घेऊन लॉक डाउन मध्ये सापडलेल्या परप्रांतीयांना सोडण्यासाठी मुंबईत गेले होते.राज्य शासनाच्या निर्देशानुसार मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड येथे परप्रांतीयांना लाल परी मधून घेऊन गेले.मोट्या धाडसाने या चालकांनी यशस्वी कामगिरी बजावली याबद्धल राधानगरी डेपो प्रमुख सागर पाटील यांनी चालकांच्यावर पुष्पवृष्टी समारंभ चे आयोजन केले.राधानगरी पंचायत समितीच्या सभापती दीपाली पाटील.माजी सभापती दिलीप कांबळे.राजेंद्र चव्हाण , या मान्यवरांच्या हस्ते सर्व चालकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment