अखेर सातारची टाळेबंदी उद्या शिथिल होणार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, July 31, 2020

अखेर सातारची टाळेबंदी उद्या शिथिल होणार


अखेर सातारची टाळेबंदी उद्या शिथिल होणार


मिलिंद लोहार-
महाराष्ट्र मिरर सातारा

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एक ऑगस्टपासून लॉकडाऊन शिथिल केला आहे जिल्हावासीयांना घरात ही मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे टू व्हीलर वरून डबल सीट ला परवानगी देण्यात आली असून सर्व दुकानांची वेळ वाढवून सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयांना गुणपत्रिका वाटल्यास परवानगी देण्यात आली आहे शिवाय अत्यावश्यक सेवा एमआयडीसी खासगी आस्थापनांना अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने दिनांक 17 जुलै रोजी अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता त्या विरोधात जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या राज्य शासनाने लॉकडाऊन शिथील करत नव्या काही आस्थापनांना परवानगी दिली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह  यांनी एक ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन संदर्भात गुरुवारी रात्री नवीन आदेश जारी केले
काय काय सुरू राहणार-
सर्व दुकाने शॉप औद्योगिक व खाजगी आस्थापना रेस्टॉरंट फूड कोर्ट मधून होम डिलिव्हरी सलून दुकाने ब्युटीपार्लर शाळा-महाविद्यालयात उत्तरपत्रिका मूल्यांकन व निकाल घोषणा 50% क्षमतेचे जिल्हांतर्गत एसटी दुचाकीवरून डबलसीट ला परवानगी मॉल व कॉम्प्लेक्स मधील मार्केट 5 ऑगस्टपासून सेतु महा-ई-सेवा केंद्र आधार केंद्र चालू राहणार
काय बंद राहणार
वृद्ध गर्भवती महिला लहान मुलांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध चित्रपटगृहे जिम व्यायाम शाळा पोहोण्याचा तलाव सामाजिक राजकीय मनोरंजन शैक्षणिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम धार्मिक स्थळे प्रार्थनास्थळे बंद राहतील
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी संकेत दिल्याप्रमाणे एक तारखेपासून सर्व पूर्ववत होईल त्याप्रमाणे गुरुवारी रात्री एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गेल्या चार दिवसापूर्वी  दिल्ली चालू आहे मात्र सातारा बंद का? तसेच छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व्यापारी संघटना यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने नक्की काय होणार याकडे सर्व सातार करांचे लक्ष लागून होते. त्याचप्रमाणे उद्यापासून साताऱ्यामध्ये टाळेबंदी शिथिल  केली आहे. मात्र आता कोरूना ला हरवण्यासाठी सातारकरांना स्वतः स्वतःचे रक्षक बनवावे लागणार आहे त्याचप्रमाणे दिवसाला वाढणारे दीडशे ते दोनशे रुग्णसंख्या कशी आटोक्यात येणार हे अनुत्तरितच आहे

No comments:

Post a Comment