जीम चालू करा जिम मालक संघटनेची मागणी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, July 31, 2020

जीम चालू करा जिम मालक संघटनेची मागणीजिम चालू करा अन्यथा  3 ऑगस्ट रोजी जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलन करणार,महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष कृष्णा भंडलकर यांचा सरकारला इशारा


महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
साधारणपणे गेल्या पाच महिन्यांपासून जिम व्यवसाय संपूर्ण देशात बंद आहे .करोनाच्या महामारित महाराष्ट्रातील साधारणपणे 15000 जिम चालक, मालक, ट्रेनर ,हाउसकीपिंग स्टाफ, योगा टीचर, झुंबा टीचर, डायटीशियन, मसाजिस्ट, न्यूट्रिशन दुकानाचे मालक ,त्यांचे कर्मचारी, न्यूट्रिशन कंपनीचे कामगार, व्यायाम शाळा साहित्य बनवणारे कामगार, तसेच इतर अनेक पूरक व्यवसायातील कामगार हे गेल्या पाच महिन्यापासून बेरोजगार आहेत. त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे  जिम व्यवसायिकांना लाखो रुपयांची थकीत भाडे, कर्मचारी पगार, लाईट बिल, मेंटेनन्स कसा भागवायचा याची चिंता लागली आहे.त्यांना आर्थिक पाठबळ द्या नाहीतर जिम चालू करण्याची मुभा द्या अशी मागणी या व्यावसायिकांनी सरकारकडे केली आहे.
 गेल्या अनेक महिने या व्यावसायिकांनी संयमाने सरकारी नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य केले आहे परंतु अनलॉक तीन मध्ये सुद्धाआमची निराशा झाली आहे .विरोधाभास म्हणजे अनेक व्यवसाय ज्यांनी कोरोना पसरू शकतो हे चालू आहेत. परंतु व्यायाम शाळा ज्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकते तो व्यवसाय मात्र आपण बंद केला आहे. यावरून सरकार आमच्या मागण्यांबाबत किती गंभीर आहे याची कल्पना येते. तसेच सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे हे दिसते. 
महाराष्ट्र जीम ओनर्स असोसिएशन आपणास विनंती करते की ही आमची व्यायाम शाळा चालू करा  आणि आम्हास आर्थिक सहकार्य द्या ही मागणी सरकार पर्यंत पोहोचवा. अन्यथा आम्ही दिनांक पाच ऑगस्ट 2020 पासून आमचा व्यवसाय चालू करू. तसेच 03 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. त्यातून काही कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या उद्भवल्यास यास सरकार जबाबदार असेल .
कृष्णा भंडलकर 
कार्याध्यक्ष
महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशन.

No comments:

Post a Comment