आ.अनिकेत तटकरे यांच्यावतीने खेड ला सुसज्ज रुग्णवाहिका - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, July 21, 2020

आ.अनिकेत तटकरे यांच्यावतीने खेड ला सुसज्ज रुग्णवाहिका

नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या प्रयत्नाने आ.अनिकेत तटकरे यांच्यावतीने खेड ला सुसज्ज रुग्णवाहिका

 ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी होणार लोकार्पण

ओंकार रेळेकर-चिपळूण

*खेड* नगरपालिकेचे कार्यसम्राट नगराध्यक्ष खेड शहरवासीयांसाठी कोरोना काळात खरे देवदूत ठरलेले खेडच्या  नागरिकांच्या मनातील खरे कोरोना योध्दा नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या अथक प्रयत्नातून विधानपरिषद आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या वतीने 
खासदार सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान रोहा च्या वतीने खेड नगरपालिका क्षेत्राकरीता सुसज्ज अशी रुग्णवाहिका मिळाली आहे,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या बुधवार दि. २२ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या मागणीवरून आमदार अनिकेत तटकरे यांच्या वतीने खेड ला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे उद्या बुधवारी लोकार्पण होणार आहे,
 कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खेड शहरातील नागरिकांना रुग्णवाहिकेची नितांत आवशकता होती ,या बाबत खेडेकर यांनी पत्रव्यवहार आणि स्वतः भेट घेऊन आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडे रुगवाहिकेची मागणी केली होती,नागरिकांची होणारी गैरसोय आणि अपघात काळात रुग्णवाहिका अत्यंत गरजेचे आहे, याचा विचार करून आमदार अनिकेत तटकरे यांनी 
तात्काळ रुग्णवाहिका देणार असल्याचे काही दिवसांपूर्वी खेड दौऱ्यात नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना सांगितले होते,त्या नुसार बुधवारी स.११वा .ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिकेत या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे,आपल्या मागणीचा लगेचच विचार करून खेड ला रुग्णवाहिका दिल्या बदल वैभव खेडेकर यांनी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी.आ.संजयराव कदम यांचे आभार मानले आहेत,

No comments:

Post a Comment