Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या वतीने सॅनिटाईझर वाटप

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या वतीने सॅनिटाईझर वाटप


ओंकार रेळेकर-
महाराष्ट्र मिरर चिपळूण
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व शिवसेना नेते रामदास कदम ह्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या वतीने चिपळूण शहर,उपनगर व शहरालगतच्या रिक्षाचालकांना सॅनिटाईझर वाटप करण्यात आले.तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांना सॅनिटाईझर व परिसर निर्जंतुकीकरण करण्याकरिता हायपो वाटप ग्राहक संरक्षण कक्षच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले.सदरचा उपक्रम शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हासंपर्क प्रमुख संतोष होळम्ब,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे ह्यांच्या मार्गदर्शनानुसार कक्ष तालुकाप्रमुख सूरज कदम,कक्ष शहरप्रमुख उदय ओतारी,कार्यालय प्रमुख अविनाश सावंत,उपतालुकाप्रमुख विजय जाधव,स्वप्नील जाधव,प्रियाताई भुवड,उपशहरप्रमुख उमेश गुरव,विभागप्रमुख प्रकाश नलावडे,अजित पवार,सुशील मोरे,रवी लाड,उपविभागप्रमुख अंबादास माळी, संजय राणे,सौरभ फागे,मोरेश्वर वैद्य,माजी तालुका संदेश किंजळकर, माजी शहर प्रमुख नितेश चिपळूणकरआदी पदाधिकाऱ्यानी सदरचा उपक्रम राबविला.सदर उपक्रमांतर्गत खेर्डी,बहदूरशेख नाका, वालोपे, पेढे,कळंबस्ते आदी गावातील रिक्षचालकांना सॅनिटाईझर वाटप करण्यात आले तर कालुस्ते, दहिवली,वालोपे,पेढे,चिपळूण शहरातील प्रभाग क्रमांक ४ व १मधील परिसरात हायपो रसायन वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies