Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

"वो कितने आदमी थे?.. और आप कितने?.. फिर भी वापस आ गये!.. क्या लगा? सरदार शब्बासी देगा?"

गब्बर !
"वो कितने आदमी थे?.. और आप कितने?.. फिर भी वापस आ गये!.. क्या लगा? सरदार शब्बासी देगा?" गब्बर सिंगचा हा आणि असे संवाद ऐकण्यासाठी हजारो सिनेरसिकांनी 'शोले' वारंवार तितक्याच चवीने पाहिला. हा गब्बर पडद्यावर साकार करणारे अमजद खान १९९४मध्ये आजच्या दिवशी वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी कायमचे पडद्याआड गेले.

बाॅलिवूडमध्ये अनेक कलावंत आले व  गेले पण केवळ एका भूमिकेमुळे भारतच नव्हे, अवघ्या जगात अजरामर झालेला गब्बर व अमजद खान विरळाच.

१९७५मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शोले'मध्ये वास्तविक अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया बच्चन या सारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळीच होती. पण सिनेमा संपल्यावर प्रेक्षकांच्या ध्यानात राहिला तो अमजद खानचा गब्बर. त्याच्या संवादाच्या कॅसेटस् बाजारात हातोहात खपल्या.

अमजद खानचे हेच यश होतं.

पेशावरला १२ नोव्हेंबर १९४० रोजी जन्माला आलेल्या अमजद खान यांचे वडिल. अभिनेता जयंत हे त्यांचे वडिल. फाळणीच्या काळात हे कुटुंब मुंबईत आले. जयंत यांनी हिंदी चित्रपटांत जम बसवला तर अमजद यांचे शालेय व नंतर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले.

शिक्षणानंतर अमजद बाॅलिवूडमध्ये काम करू लागले. अनेक चित्रपटांत छोट्या-मोठ्या भूमिका केल्यानंतर त्यांची ऐतिहासिक 'शोले'साठी निवड झाली. या संधीचे त्यांनी सोने केले.

नंतरही ते भूमिका करत राहिले. 'शतरंज के खिलाडी', 'उत्सव' अशा समांतर चित्रपटांत त्यांनी चाकोरीबाहेरच्या भूमिका केल्या. त्या चित्रपट समिक्षकांनी उचलून धरल्या.

यशाच्या मार्गाने जात असतानाच १९७६ मध्ये मुंबई-गोवा रस्त्यावर त्यंच्या कारला भीषण अपघात झाला. 'मुंबई टू गोवा' चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते निघाले होते. उपचारांच्या दरम्यानच्या औषधोपचारांमुळे त्यांचे वजन प्रचंड वाढले.

अतिवजनाच्या व्याधीमुळेच १९९२ मध्ये आजच्या दिवशी ह्रदयविकाराने त्यांचे निधन झाले.

खलनायक असूनही 'गब्बर की पसंद' लहान मुलांमध्येही कमालीची लोकप्रिय करण्याची किमया साधणारा ताकदीचा कलावंत हीच अमजद खान यांची खरी ओळख!

- डॉ.भारतकुमार राऊत
   माजी खासदार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies