शशिकांत चव्हाण यांनी घेतली आमदार भास्करराव जाधव यांची सदिच्छा भेट
खेड दापोली मंडणगड मध्ये शिवसेना वाढीसाठी करणार प्रयत्न
ओंकार रेळेकर-चिपळूण
शिवसेनेत परतल्यानंतर माजी जिल्हा प्रमुख श्री. शशिकांत चव्हाण यांनी माजी मंत्री, आमदार श्री. भास्करराव जाधव यांची चिपळूण येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी बांधकाम व आरोग्य सभापती श्री. अण्णा कदम, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते श्री. विक्रांत जाधव, जि.प. शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री. सुनिल मोरे, लोटे गट जि. प. सदस्य श्री. अरविंद चव्हाण तसेच श्री. संतोष सुर्वे आदी उपस्थित होते. यावेळी आ. श्री. जाधव यांनी श्री. चव्हाण यांचे स्वागत करून आता एकत्र काम करून पक्ष संघटना अधिक सक्षम करूया, असे सांगितले.