रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. किरण पाटील रुजू - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, July 24, 2020

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. किरण पाटील रुजू

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. किरण पाटील रुजू
 
संतोष दळवी
महाराष्ट्र मिरर टीम

इचलकरंजी येथील रहिवासी असलेले व मंत्रालयात कृषी अर्थ आणि शिक्षण विभागात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ . किरण नेमगोंडा पाटील यांची रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून ते आज त्यांच्या पदावर  रुजुही झाले आहेत.या आधी त्यांनी मुख्य सचिव यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून उत्कृष्ट काम पाहिले आहे.सातारा येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झालं असून मुंबई विद्यापीठातून त्यांनी लॉ च शिक्षण आणि ई गव्हर्नन्स या विषयात पीएचडी पूर्ण केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्य सचिवांत सोबत उल्लेखनीय काम केले आहे.आज त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्र हाती घेतली आहेत.त्यांच्या कामाचा उरक आणि अचूक नियोजन यामुळे रायगड जिल्ह्याला चांगला फायदा होईल असं बोललं जातंय.

No comments:

Post a Comment