अक्षय आदवडे यांची भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्षपदी निवड* - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, July 17, 2020

अक्षय आदवडे यांची भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्षपदी निवड*

काडवली येथील अक्षय आदवडे यांची भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्षपदी निवड               .    .    .      
ओंकार रेळेकर-चिपळूण

भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्षपदी काडवली काजवेवाडीतील होतकरू तरुण अक्षय आदवडे यांची नुकतीच निवड झाली आहे. ही निवड उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड. विनय नातू यांनी जाहीर केली आहे. या निवडीबद्दल अक्षय आदवडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.                                             अक्षय आदवडे यांना शालेय जीवनानंतर सामाजिक व राजकिय क्षेत्राची आवड निर्माण झाली. यातून ते या दोन्ही क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषतः भाजप पक्षाची कास धरून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. अक्षय यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर यापूर्वी युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य नंतर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. तसेच धामणंद पंचायत समिती गण क्षेत्र प्रमुख म्हणून काम केले. या पदांच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. याची दखल घेऊन उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड. विनय नातू यांनी अक्षय आदवडे यांच्यावर युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदाची नुकतीच जबाबदारी सोपवली आहे. याबद्दल अक्षय म्हणाले की, वरिष्ठांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन आणि खेड तालुक्यात युवकांची मजबूत संघटना बांधणीसाठी प्रयत्न केले जातील, असे शेवटी सांगितले.

No comments:

Post a Comment