सावित्री खाडीवरील आंबेत पुलावरील अवजड वाहतूक बंदी अधिसूचनेस मुदतवाढ - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, July 17, 2020

सावित्री खाडीवरील आंबेत पुलावरील अवजड वाहतूक बंदी अधिसूचनेस मुदतवाढसावित्री खाडीवरील आंबेत पुलावरील अवजड वाहतूक बंदी अधिसूचनेस मुदतवाढ

अलिबाग-महाराष्ट्र मिरर

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  निधी चौधरी यांनी म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (राज्य मार्ग क्र.101) सावित्री खाडीवरील आंबेत पुलावरुन दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जीप इत्यादी व्यतिरिक्त बस, ट्रक, टेम्पो इ.वाहनांची जड वाहतूक बंद करण्याबाबतच्या पूर्वीच्या आदेशास दि.30 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 
       या पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यासाठी यापूर्वी काढलेल्या अधिसूचनेची मुदत दि.26 जुलै 2020 रोजी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार आंबेत पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक बंद करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश नव्याने जारी केले आहेत.

No comments:

Post a Comment