चिपळूण भाजपच्या शिष्टमंडळाने दिली कामथे रूग्णालयाला भेट - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, July 31, 2020

चिपळूण भाजपच्या शिष्टमंडळाने दिली कामथे रूग्णालयाला भेट

चिपळूण भाजपच्या शिष्टमंडळाने  दिली कामथे रूग्णालयाला भेट
ओंकार रेळेकर-चिपळूण

शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे उपचार घेणाऱ्या कोवीड - १९ रुग्णांच्या तक्रारी गेले काही दिवस भाजप चिपळूणकडे येत होत्या. भाजप चिपळूणच्या शिष्टमंडळाने आज कामथे रुग्णालयातील डॉ.अजय सानप, नर्स आणि कर्मचारी यांची भेट घेऊन रुग्णांना उद्भवणाऱ्या समस्यांवरती चर्चा केली. डॉ. सानप यांनी या समस्यांची ताबडतोब दखल घेत यात स्वत: लक्ष घालून सर्व रुग्णांसाठी गरम पाणी, औषधे, ऑक्सिजन याची व्यवस्था केली. डॉक्टर आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या असे निदर्शनास आले शासनस्तरावरून रुग्णालयास होणारी मदत ही अपुऱ्या प्रमाणात होत आहे. उदा. पल्स ऑक्सॅमीटर कमी पडत आहे, सफाई कर्मचारी आणि नर्स यांची कमतरता, औषधांचा अपुरा साठा.  या वेळी भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. विनोद भोबस्कर, शहराध्यक्ष श्री.आशिष खातू, जिल्हा चिटणीस श्री. संतोष वरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. महेश दिक्षीत, तालुका सरचिटणीस श्री. वसंत ताम्हणकर, श्री. तुषारजी गोखले, युवा कार्यकर्ते कु.मंदार कदम उपस्थित होते.

No comments:

Post a Comment