उदय जोशी यांची नियुक्ती - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Wednesday, July 8, 2020

उदय जोशी यांची नियुक्तीराष्ट्रीय सहकारिता विकास निगम नियामक मंडळावर प्रा.डॉ.उदय जोशी यांची नियुक्ती

 महाराष्ट्र मिरर वृत्तसेवा-अलिबाग

प्रा.डॉ.उदय जोशी यांची राष्ट्रीय सहकारिता विकास निगम National Cooperative Development Corporation (NCDC) नियामक मंडळावर केंद्र शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून, केंद्रीय कृषी मंत्रालयाने पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.
       NCDC वर प्रतिनिधित्व करण्याची रायगड जिल्ह्यास या निमित्ताने प्रथमच संधी मिळालेली आहे. NCDC तर्फे देशभरातील सहकार संस्थांना (विशेषत: सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, मच्छीमार संस्था, दुग्धसंघ,इ) दिर्घ मुदतीचा वित्त पुरवठा करण्यात येतो. केंद्रीय कृषी मंत्री या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.  IAS श्रेणीतील अधिकारी कार्यकारी संचालक असतात. या नियुक्तीचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून डॉ.उदय जोशी यांचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment