पावसाची संततधार - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, July 4, 2020

पावसाची संततधार

चिपळुणात पावसाची सततधार , नद्या दुधडी भरून वाहू लागल्याने सतर्कतेचा ईशारा

 ओंकार रेळेकर
चिपळूण 

शहरात आणि ग्रामीण भागात काल रात्रीपासून अद्याप पर्यंत पाऊस  संततधारपणे कोसळत आहे. सदरच्या पावसाला जोर असल्याने वाशिष्ठी, शिव नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. बाजारपुलाला पाणी टेकायला आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
           उद्या पौर्णिमा असल्याने पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे काही दिसून येत नाहीत.त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पूरस्थिती लक्षता घेता नागरिकांनी सावध राहण्याच्या सूचना प्रशासन करीत आहेत परंतु दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता नागरिकांनी सावध राहावे .सध्या लॉकडाऊन मुळे नागरिक घरातच बंदीस्त आहेत अशा प्रसंगी सोशल डिस्टनसिंग आणि सोशल आवेअरनेस बाळगून नागरिकांनी आपली काळजी घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment