Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पाल्यांचे ऑनलाईन surfing पालकांनी विशेष लक्ष ठेवावे ,सायबर चे आवाहन.  पाल्यांचे ऑनलाईन surfing
 पालकांनी विशेष लक्ष ठेवावे
      सायबर चे आवाहन


महाराष्ट्र मिरर टीम -मुंबई 

 पाल्यांचे ऑनलाईन surfing वर
 पालकांनी विशेष लक्ष ठेवावे. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे  करण्यात येत आहे.
      विशेष करून ०७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांना विनंती करते कि आपले पाल्य ऑनलाईन surfing करताना आपण त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावे . जर ते कोणाशी ऑनलाईन चॅट करत असतील तर समोरची व्यक्ती कोण आहे याची  माहिती करून घ्या ,तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व कॉम्पुटरद्वारे कोणत्या वेबसाइट्सवर क्लीक करत आहेत,किंवा  काय वेबसाईट browse करत आहेत यावर लक्ष ठेवा. 
    *पोर्नोग्राफिक टाळा*
    तसेच स्वतः सुद्धा पोर्नोग्राफिक वेबसाईट शोधून त्यावर क्लिक करणे टाळा कारण सध्या चाईल्ड पोर्नोग्राफीचे बघण्याचे  प्रमाण वाढत आहे . आपल्या पाल्यास कोणी ऑनलाईन धमकावत तर नाही याची खात्री करा.  तसेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक आपल्या पाल्यास देण्याचे टाळावे ,तसेच काही ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही त्यांच्या  बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा . जर कोणत्याही पालकास असे निदर्शनास आले कि आपले पाल्य हे कोणत्यातरी ऑनलाईन fraud किंवा ऑनलाईन रॅकेट मध्ये अडकलेत किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनलेत तर घाबरून न जाता आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रारीची नोंद करा व त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण द्यावी .
 तसेच केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका.
       असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies