अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या एकंदर कार्याची "मास्टर की" म्हणजे "विजय". - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या एकंदर कार्याची "मास्टर की" म्हणजे "विजय".


"मास्टर की" म्हणजे विजय भोसले


अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या एकंदर कार्याची "मास्टर की" म्हणजे "विजय". 


एक्सप्रेस वे वरचा अपघात असो कि, अन्य कुठला, खोल पाण्याच्या प्रवाहातले रेस्क्यू ऑपरेशन असो कि अग्नीप्रलय, सापाचा कॉल असो कि  पाण्यातली  मगर वाचविण्याची जोखीम असो, उंच झाडावरच्या पक्ष्यांचे जीव वाचविण्यासाठीची खटपट, खोल दरीतील कॉल किंवा उंच डोंगरावरच्या ट्रेकर्सची  सुरक्षित सोडवणूक करणे अश्या निरनिराळ्या मोहिमेवर कुशलतेने काम करणारे हात, मनाची तयारी, शारीरिक क्षमता आणि तन्मयतेने किंबहुना आपलेपणाने करणारा "विजय" म्हणजे एक आश्चर्य आहे. 

 

विजयला त्याचे वडील "कै सुरेशदादा" यांच्या मार्गदर्शनाचा नव्हे तर, पाठबळाचा संदर्भ आहे. आई वडिलांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या विजयला त्याची पत्नी "सौ प्रतिमाची" सर्वार्थाने साथ आहे एवढेच नव्हे तर आपल्या पतीच्या समवेत आपणही पदर खोचून फिल्ड वर उतरण्याची मानसिकता तिच्याकडे असल्याने  ती अपघातच्या युवा टीमची सदस्या आहे. विजयची सर्वात महत्वाची प्रेरणा स्त्रोतं म्हणजे त्याचे चिरंजीव "जय आणि वीर".  शोलेमधल्या त्या अविस्मरणीय जोडीसारख्या जय आणि वीरच्या प्रोत्साहनाची केमेस्ट्री विजय सोबत असते म्हणून तो नेहमी उत्साही असतो. अर्थात भोसले कुटुंबातला प्रत्येक घटक विजयला सामाजिक क्षेत्रांत काम करण्यासाठी बळ  देत असते म्हणूनच आज विजयचे व्यक्तिमत्व इतरांच्यापेक्षा वेगळं आहे. 


वेळ कोणतीही असो, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी धावणारा विजय हा माझ्यासाठी तर साक्षात देवदूत ठरलाय. कित्येक अपघातात मदत करत असताना आमच्या सुरक्षिततेकडे लक्ष ठेवणारा विजय मला ह्रदयविकाराचा ऍटॅक आला तेंव्हा अमोलसह काही क्षणांत माझ्या घरी पोहचून डॉ मोहितेंच्याकडे घेऊन गेले म्हणून मी वाचलो असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. कोरोनाची मला बाधा झालेली असताना PPE किट घालून ICU मध्ये मला हिंमत देण्यासाठी आलेल्या देवदूतांमध्ये विजय देखील होता. 


अत्यंत संयमाने आणि परिस्थितीनुरूप ठोस निर्णय घेणारा विजय म्हणजे आमच्या टीमचे बलस्थान आहे. 


आपल्या शरीरयष्टीला सुधृढ ठेवण्यासाठी नित्यनियमाने व्यायाम आणि संतुलित आहार घेणारा विजय हा "देवदूत" या उपाधीने महराष्ट्राच्या मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांच्याकडून नावाजला गेला आहे.  यापुढेही  असेच सन्मान त्याच्या कर्तृत्वासाठी मिळावेत यासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद. 


गुरुनाथ रामचंद्र साठेलकर

खोपोली

No comments:

Post a Comment