केंद्र सरकार आणि राज्य सरकार मध्ये संभ्रम ई पास वरून नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

केंद्र सरकार आणि राज्य सरकार मध्ये संभ्रम ई पास वरून नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण

केंद्र सरकार आणि राज्य सरकार मध्ये संभ्रम 
ई पास वरून नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण


एसटीतून जायचे तर पास लागणार नाही

 मात्र प्रायव्हेट ने जायचे असेल असेल तर ई पास आवश्यक

मिलिंद लोहार-

 महाराष्ट्र मिरर टीम सातारा


नुकताच केंद्र शासनाने ई पास साठी सर्व राज्य शासनाने निर्बंध काढावेत व केंद्र शासनाचे आदेश पाळावेत असे आदेश दिले आहेत त्यातच महाराष्ट्र मध्ये एसटी सुरू करण्यात आली मात्र जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पास लागणार नाहीत असे सांगण्यात आले मात्र प्रायव्हेट गाडीने जायचे असल्यास तुम्हाला ई  पास बंधनकारक आहे यामधून असे स्पष्ट होते की कोरोना संसर्ग काळात एसटीने जाणाऱ्याला बहुतेक करून कोरोना होत नसावा असा निष्कर्ष काहीजणांनी काढला आहे व प्रायव्हेट गाडीने गेल्यानंतर बहुतेक करून कोरोना होतो गणपती काळात एसटीने जाण्याचा व कोणत्याही प्रकारचा पास नं चालण्याचा घाट कुणासाठी का फक्त कोकणातील लोकांसाठी सर्वात जास्त मताधिक्य कोकणातून असून त्यांच्या भविष्यातील मतांसाठी तर हे नाही?

आता तर असे सांगण्यात येत आहे की एसटी ने प्रवास करणाऱ्यांना देखील पास देता येईल का याबद्दल आपण विचार करत आहोत मात्र मग हा पास बंद का केला होता हा प्रश्न उपस्थित होतो आता एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या आठ दिवसांमध्ये  किती हजाराने झाली किती हजार लोक हे कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यात गेले याचा हिशोब आहे का कोणाकडे त्यांची हिस्टरी आहे का ?कोणाकडे त्याच्यातील कोरोना पॉझिटिव लोक किती होते ?यांची माहिती आहे का कोणाकडे ?नागरिकांमध्ये संभ्रम कोणी निर्माण केला केंद्र सरकार सूट देत असताना देखील सामान्य जनतेला वेठीस का धरले जात आहे? ई पास मुळे सातारा सांगली कोल्हापूर पुणे रायगड रत्नागिरी नाशिक औरंगाबाद येथून तरुणांना यायला भीती वाटत आहे हे एकदा पास चालू करतात एकदा पास बंद करतात नक्की चालले तरी काय आहे 

हे काय आहे ते एकदा डिसिजन घ्या अनलॉक  फोर सुरू झालेले आहे आहे केंद्र सरकारने तसे निर्देश दिलेले आहेत मात्र आपण अनलॉक करत आहोत का पुन्हा लाँक होत आहोत तेच कळत नाही मात्र तरुण वर्ग ह्या ई पास नकोच ह्या भूमिकेत आहे सध्या सोशल मीडियावर फेसबुकच्या माध्यमातून तरुण वर्गाच्या परखड भूमिका स्पष्ट दिसून आल्या त्यातील काही महत्त्वाच्या परखड भूमिका म्हणजेच आम्हाला कळते तोरणा काळात कसे राहायचे ते सहा महिने झाले आता तरी आम्हाला कामाला जाऊ द्या ई पासचे बंधन काढून टाका अशाप्रकारच्या विविध कमेंट्स फेसबुक वर पडत आहेत मात्र गणपती नंतर किंवा मध्ये आधी जर लालपरीला देखील पास सुरू झाले तर तरुण वर्गाच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागणार 

त्यातच बऱ्याच ठिकाणी ई पास काढण्यासाठी भरीव रक्कम घेऊन लगेच पास मंजूर होतो मात्र नागरिकांना आपल्या मोबाईल वरुन e-pass मिळत नाही ही खूप खेदाची गोष्ट आहे हे मात्र हे मधील दलाल चांगल्या प्रकारे मलई खातात व त्यामुळे सामान्य जनतेला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना त्रास सहन करावा लागत आहे तरी लवकरात लवकर केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करत राज्य सरकारही ही योग्य तो निर्णय घेईल च अशी सामान्य जनतेला आहे

No comments:

Post a Comment