गौराईचे आज उत्साहात आगमन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

गौराईचे आज उत्साहात आगमन


गौराईचे आज उत्साहात आगमन

 मिलिंदा पवार -

महाराष्ट्र मिरर टीम खटाव

                             स्पेशल स्टोरीश्रावण महिना संपता संपताच वेध लागतात ते भाद्रपदात येणाऱ्या गौरी गणपतीचे गणपतीच्या आगमनानंतर तीन दिवसांनी येणारी ही गौराई कधीकधी तेथेच या बदलाने मागेपुढे ही पण निसर्गाचेच रूप आहे तिची रूपे वेगवेगळी आहेत गणपतीच्या आदल्या दिवशी हरितालिका पूजनाने शंकराला प्रसन्न करणारी उमा गणपतीच्या आगमनानंतर लगेचच आपल्या मुलाला विरह सहन न होऊन की काय तीही आपल्या भेटीला येते

पण तिच्या येण्याची वाट प्रत्येक स्त्री पाहते कारण ती माहेरवाशिण असते ना! रुणझून च्या पाखरा जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी घाली लिंबलोण सडा अशी अनेक गाणी म्हणूनच तिच्यावर रचली गेली आहेत

तिची स्थापना वेगवेगळ्या प्रकारे करतात कोणी विहिरीवरून किंवा जवळपासच्या पान व त्यावरून तिला वाजत गाजत घरी आणतात घराच्या सर्व भागात तिला फिरवतात जिथे जिथे पावलं काढली असतील त्या सर्व जागी ही गौर फिरते असे मानतात ही पावले घरात येणारी मंगलमय असतात गौराई जनतेच्या पायांनी घरात मंगलमय वातावरण घेऊन येते पान व त्यावरून कोणी गौरीचे तिला महालक्ष्मी म्हणण्याची प्रथा हे मुखवटे आणतात पितळी मातीचे किंवा हल्ली सोफ्ट टॉईज मटेरियलचे ही काही घरात पाण्याचा भरलेला कलश घागर आंब्याच्या पाना सहित आणतात व त्यावर एखाद्या वाटेत पाच किंवा सात खडे असतात व त्यांची गौराई म्हणून पूजा करतात या खेड्यांच्या गौरी पेक्षा महालक्ष्मी म्हणून उभ्या करण्यात येणाऱ्या गौरींचा मोठा थाट आहे

चैत्रगौरी सारखी आरास यांच्यापुढे ही करतात लाडू चकल्या करंज्या यांसारख्या दिवाळीत च्या पदार्थांचीही या काळात रेलचेल असते काही ठिकाणी नुसते मुखवटे ठेवतात काहींच्या घरी बैठ्या गौरी असतात तर काहींच्या उभ्या उभ्या महालक्ष्मी यांना पितळी किंवा लाकडी स्टँड ही असतात किंवा कोणी कोठे यांना साड्या नेसवून त्यावर मुखवटे बसवतात काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे तर काही पितळी तर काही लाकडाची असतात ज्या प्रमाणे स्टॅन्ड त्याप्रमाणे कॉटनच्या साड्या नेसवताना त्या कोठ्या लाडू करंज्या सारख्या निष्ठांनी भरूनही ठेवण्याची पद्धत काही लोकांकडे आहे 

त्या दोन गौरींना ज्येष्ठा व कनिष्ठा असे संबोधतात दोघींच्या मध्ये एक बाळ ठेवण्याची पद्धत आहे गव्हाच्या व तांदळाच्या राशी तिच्यापुढे मांडतात त्यांना अलंकारांनी म्हणतात त्यांच्या साड्याही नवीन घेतात त्यांचे मुकूट गळ्यातील अलंकार बांगड्या साड्या असा सर्व थाट पाहून डोळ्याचे पाणी फिरते काही घरात एक सासुरवाशीन व एक माहेरवाशिन विवाहित किंवा कुमारीका अशा या दोघी जणी गौरी आणतात तर काही घरात दोघीही सवाष्ण असतात त्यांना साड्या नेसण्याचे कामही घरच्या दोन सुना करतात काही ठिकाणी गवा तांदळाची रास फराळाचे पदार्थ फळांवर अशा समृद्धी सजवलेली गौराई आलेल्या दिवशी मात्र भाजी-भाकरीचा नैवेद्य आणि तृप्त होते


दुसर्‍या दिवशी महालक्ष्मी पूजन करून सवाष्ण जेवायला घालतात आरती करतात पुरणपोळीचा बेत असतो शक्य नसल्यास नैवेद्य पुरते घरी पुरण घालतातच व तिसऱ्या दिवशी पानावर दहीभाताचा नैवेद्य देऊन त्यांचे विसर्जन होते काही लोकांकडे या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा करतात एका घागरी पाणी भरून ती घागर कर्दळीच्या पानावर गव्हाच्या राशीवर काकडीच्या फोडी ठेवून त्यावर ठेवतात तिच्यावर गंधाने 64 योगिनी काढून म्हणजेच आकृती काढून त्यावर कलश ठेवला जातो आणि चौसष्ट योगिनींच्या फोटोचे ही पूजा करतात यंदाच्या गणेशोत्सवात कोणाच्या प्रादुर्भावामुळे महिला वर्गांना सर्व काही सुकर नाही मात्र तरीही बहुतेक गृहिणींनी गौरी सजावट अतिशय उत्तम प्रकारे केले आहे

No comments:

Post a Comment