राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सौजन्याने ब्रम्हनाळ येथे यांत्रिक बोटींचे लोकार्पण - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 19, 2020

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सौजन्याने ब्रम्हनाळ येथे यांत्रिक बोटींचे लोकार्पण

 

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सौजन्याने ब्रम्हनाळ येथे यांत्रिक बोटींचे लोकार्पण

सुधीर पाटील सांगली

डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधीतून राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सौजन्याने ब्रम्हनाळ येथे यांत्रिक बोटींचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मागील वर्षी झालेल्या  ब्रम्हनाळ बोट दुर्घटनेतील नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमादरम्यान बोट दुर्घटनेतील कुटुंबियही उपस्थितीत होते. 


विश्वजीत कदम यांनी अत्यंत चांगल्या दर्जाच्या हलक्या आणि दर्जेदार बोटी परदेशातून बांधवांसाठी मागवल्या आहेत. मंत्री कदम यांनी गतवर्षीच्या महापुरात उल्लेखनीय कार्य केले होते. आज देखील त्यांनी यांत्रिक बोटी उपलब्ध करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. त्यांचे आभार मानण्यात आले


सध्या धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली नाही मात्र प्रशासनाने संपूर्ण खबरदारी घेतली आहे. पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. आज आणि उद्या हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे त्यासाठीही प्रशासन सज्ज आहे. प्रशासन कर्नाटक सरकारच्याही संपर्कात आहे. तिकडेही पाण्याचा विसर्ग केला आहे.


टेंभू व म्हैसाळ या दोन्ही योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी भागाला आता पाणी मिळणार आहे. सोलापूरपर्यंत हे पाणी न्यायचा मानस आहे त्यामुळे तिथल्याही दुष्काळी भागांना दिलासा मिळणार आहे.No comments:

Post a Comment