तासगाव ते पाचवा मैल रस्ता रहदारी योग्य करा-संजय दादा पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पक्ष यांची मागणी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 19, 2020

तासगाव ते पाचवा मैल रस्ता रहदारी योग्य करा-संजय दादा पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पक्ष यांची मागणी

 तासगाव ते पाचवा मैल रस्ता रहदारी योग्य करा-संजय दादा पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पक्ष यांची मागणी


        सुधीर पाटील-सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तासगाव ते पाचवा मैल हा NH4-266 या रस्त्याचे एका बाजूने खुदाई काम सुरू असून दुसरी बाजू रहदारी साठी योग्य असणे गरजेचे असताना हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. परिणामी वाहतूक करताना लोकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे.म्हणून हा रस्ता रहदारी योग्य व्हावा यासाठी तहसिलदार मॅडम यांना निवेदन दिले.


      दादांनी या रस्ताच काम पाहणाऱ्या अभियंता बारटक्के  यांना तात्काळ बोलावून घेतले व या रस्त्याच्या कामाच्या दुरवस्थेबद्दल विचारणा केली असता सात दिवसात हा रस्ता रहदारी योग्य करू असे बारटक्के यांनी सांगितले.... 


      यावर सात दिवसात रस्ता रहदारी योग्य न केलेस कॉन्ट्रॅक्टर  रहदारीचा रस्ता करण्याचे बिल अदा करेल आणि  कार्यकर्ते रस्ता करून घेतील त्यापुढे ठेकेदार रद्द करणेची कार्यवाही करून घ्यावी अशी सूचना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय दादा पाटील वडगांव यांचे वतीने देणेत आली आहे याबाबत बारटक्के यांनी  तहसीलदार  यांच्यासमोर  याबाबत  हमी दिली आहे.


       यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत शेळके, निमणी उपसरपंच दिनकर पाटील, अनिल सदामते, चंद्रकांत लोंढे, मदन पाटील,डी ए पाटील, सुशांत पाटील,गणेश जाधव निमणी पाचवा मैल परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.No comments:

Post a Comment