कर्जतकरांसाठी""फिट इंडिया फ्रीडम रन"" - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, August 29, 2020

कर्जतकरांसाठी""फिट इंडिया फ्रीडम रन""

  

कर्जतकरांसाठी""फिट इंडिया फ्रीडम रन""केंद्रीय युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड, यांनी पुढाकार घेवून 'फिट इंडिया फ्रीडम रन' हा नवीन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. आपल्या मानवी शरीरास व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते, यासाठी  सायकलिंग हा अतिशय उपयुक्त व्यायाम प्रकार आहे. आपल्या जीवनात व्यायामाचे महत्त्व पटावे म्हणून, केंद्रीय युवा व खेल मंत्रालय यांनी फीट इंडिया फ्रीडम रन (fit India freedom run) हा कार्यक्रम संपूर्ण भारतभर  आयोजित करण्यात येत आहे. आपल्यालाही यात सहभागी होतात यावे म्हणून *कर्जत सायकल प्रेमी* आणि *रक्षा सामाजिक विकास मंडळ* यांच्यातर्फे कर्जत परिसरामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


कार्यक्रमाची रूपरेषा:- 

ठिकाण:- कर्जत शहर परिसर.

सोमवार, दि 31 ऑगस्ट 2020.

सायकलिंग चे अंतर अंदाजे 15 किलोमीटर.

वेळ :- सकाळी 06:30hrs ते  07:30hrs

वयोमर्यादा:-  कमीत कमी 12 वर्ष.

सूचना:- 

# तुमची सायकल सुस्थितीत असणे गरजेचं आहे.

# सायकल सोबत आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट असणे गरजेचे आहे.

# यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही.

# आपल्या सोबत एक प्रथमोपचार पेटी असणार आहे.  

# सायकलींगच्या कार्यक्रमादरम्यान कोणतीही दुखापत अथवा अपघात झाल्यास वरील संस्था जबाबदार असणार नाही. 

#जास्तीत जास्त 25 जणांना यामध्ये सहभाग घेता येईल. प्रथम नाव नोंदवण्यास प्राधान्य.


नाव नोंदणीसाठी संपर्क:-

 श्रीराम फाटक 

92704 03518


श्री अमित गुरव 9421008778

No comments:

Post a Comment