बँड व बँजो व्यवसायिकांना शासकीय अनुदान जाहीर करा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, August 29, 2020

बँड व बँजो व्यवसायिकांना शासकीय अनुदान जाहीर करा


बँड व बँजो व्यवसायिकांना शासकीय अनुदान जाहीर करा

 जिल्हाध्यक्ष योगेश माने यांची मागणी

मिलिंद लोहार-साताराबँड बेंजो कलाकारांना लोककलेला दर्जा द्यावा गेल्या मार्च महिन्यापासून बँड व्यावसायिकांवर कोरोना च्या संकटामुळे संकटामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे बँड व्यवसायिक यांचा हंगाम पूर्ण लॉकडाउनच्या काळामध्ये वाया गेलेला आहे .

       सातारा जिल्ह्यामध्ये छोटे-मोठे 800 ते 900 बँड व्यावसायिक आहेत एका बँडच्या ताफामध्ये 25 कलाकार असतात ते शुभ कार्याची शोभा वाढवण्याचे काम करत असतात सर्व कलाकार मागासवर्गीय समाजातील आहेत त्यांचे कला हेच जीवन असे गृहीत धरून जगत असतात त्यांना कोणतेही शासनाचे अनुदान मिळत नाही तरी कोरोनाच्या संकटामुळे त्यांचा व्यवसाय सुरू होऊ शकत नाही तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कोणतेही उपजीविका नाही त्यामुळे त्या कुटुंबाला उपासमारीची वेळ आलेली आहे.

 तरी शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी व बँड कलाकारांना लोक कलेचा दर्जा देण्यात यावा अन्यथा इच्छामरणाची परवानगी मिळावी ही विनंती तरी शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार असेल त्यावेळी बँड व्यवसायिक श्री दीपक जाधव अजित माने संतोष जाधव रवींद्र चव्हाण संतोष संतोष साळुंखे संभाजी माने इत्यादी उपस्थित होते माननीय जिल्हाधिकारी सातारा तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे

No comments:

Post a Comment