Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

स्वच्छता सर्व्हेक्षणात राज्यातून माथेरान नगरपरिषद अव्वलस्थानी

 स्वच्छता सर्व्हेक्षणात राज्यातून माथेरान नगरपरिषद अव्वलस्थानी 


 कर्मचारी वर्गाचे नगराध्यक्ष  प्रेरणा सावंत यांच्याकडून कौतुक 


 चंद्रकांत सुतार-माथेरान माथेरान नगरपरिषदेने यावेळेस सन २०२० मध्ये स्वच्छ सर्व्हेक्षणात संपूर्ण पश्चिम विभागातील एकूण पाच राज्यांमध्ये आठवा क्रमांक प्राप्त केला असून महाराष्ट्र राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे.तर ऑल इंडिया रेंकिंग मध्ये 1 लाख लोकसंख्येमध्ये 24 वा क्रमांक पटकावला आहे.


माथेरान हे पर्यावरण दृष्टीने संवेदनशील क्षेत्र असून अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत इथे कुठल्याही प्रकारची अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध नसताना प्रत्येक कामावर विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी अत्यंत बारकाईने लक्ष केंद्रित करून स्वच्छता बाबतीत कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ओला आणि सुक्या कचऱ्याचे सुयोग्य पध्दतीने विलगिकरण त्याचप्रमाणे प्लास्टिक मुक्त माथेरान करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते आणि आजही ही संकल्पना कायम सुरू ठेवली आहे.


तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासारखे उत्तम अधिकारी  त्या वेळी  इथे कार्यरथ होते.त्यांनी येथील डंपिंग ग्राउंडचे उत्तरे प्रकारे नियोजन करून सर्वतोपरी सहकार्य केले होते. त्यांच्या कार्यकाळात गावातील प्रत्येक ठिकाणी  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट नियोजन योग्य पध्दतीने लावली होती.त्यास सर्व माथेरान  करानी  उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता.

कुठल्याही प्रकारची यांत्रिक साधनसामग्री नसताना माथेरान नगरपरिषदेने स्वच्छ सर्व्हेक्षणात पश्चिम विभागातील एकूण पाच राज्यांमध्ये आठवा क्रमांक प्राप्त केला असून महाराष्ट्र राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे.त्यामुळे नगरपरिषदेच्या सर्व टीमचे आज छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला  यावेळी मुख्याधिकारी, प्रशांत जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,यांनी आपल्या  भाषणात सर्वप्रकारचे स्वछता कर्मचारी वर्गाचे,  कौतुक करत नागरिकांचे पत्रकांराचे  स्वछता अभियानात मोलाचे सहकार्य  केल्या बद्दल आभार मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies