Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मानाचे गणपती व अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कुणालाही परवानगी देता येणार नाही,उपमुख्यमंत्री अजित पवार

मानाचे गणपती व अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कुणालाही परवानगी देता येणार नाही,उपमुख्यमंत्री  अजित  पवार 

प्रियांका ढम-लोणी काळभोर


पुणे जिल्ह्यातील 'कोविड व्यवस्थापन व नियोजना'बाबत बैठक झाली. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णदर व मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. कोरोनाच्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. कोरोनाबरोबरच पावसाळ्यातल्या अन्य संसर्गाचे आजार व सारी आजाराच्या रुग्णांवर वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीनं आरोग्य विभागानं आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पुण्यातलं गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळं संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणं आवश्यक आहे.

 नागरिकांनी घरातल्या गणपतींचं घरातच तर, सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींचं विसर्जन साधेपणानं करणं गरजेचं आहे. कुणीही सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करू नये. 'कोरोना'चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती व अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कुणालाही परवानगी देता येणार नाही, याची पोलीस विभागानं दक्षता घ्यावी, असं सूचित केलं. कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पुरंदर विमानतळाचं काम लवकरात लवकर सुरू होऊन गतीनं पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असं उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितलं. पुणे - नाशिक रेल्वे मार्गाचं काम मार्गी लागण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. पुणे मेट्रोसह जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कामं वेगानं पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies