Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सारा विकास पाटील या दिव्यांग मुलीने तयार केल्या नाविन्यपुर्ण शैक्षणिक राख्या.
सारा विकास पाटील या दिव्यांग मुलीने तयार केल्या नाविन्यपुर्ण शैक्षणिक राख्या.अमूलकुमार जैन-मुरुड
 

    रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उरण  येथे राहत असलेली  कुमारी सारा विनिता विकास पाटील ही स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान सिबर्ड दिव्यांग मुलांची शाळा बोरी ता.उरण येथे शिक्षण घेत आहे. या शाळेच्या माध्यमातून दरवर्षी राख्या बनविण्याचा उपक्रम घेतला जातो. येथील दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेगवेगळ्या कला शिकवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी असे उपक्रम राबविले  जातात.

मात्र  यावर्षी कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहे. मुलांना राख्या घरी बनवण्याचा उपक्रम शाळेमार्फत घेण्यात आला . सारा पाटील हिने पालकांच्या मदतीने शेक्षणिक राख्या तयार केल्या. यावेळी साराच्या वडिलांनी शैक्षणिक राख्या तयार करण्यासाठी सारा पाटील हिला प्रवृत्त केले.

यासाठी तीने टाकावू वस्तुंचा वापर केला. बॉटलची झाकणे घेऊन फुलासारखी कापली . झाकणांना कलर लावला. त्यात अंक लिहले. 

बाजारातील कापडी पिशवी कापून.त्या पिशवीपासून फुले व पट्ट्या तयार केल्यानंतर त्यावर पिस्त्याची टरफले रंगवून लावण्यात आली आहेत. अशा प्रकारे शेक्षणिक वेगवेगळ्या राख्या  तयार करण्यात आल्या आहेत. 

या राखीचा उपयोग मुलांमध्ये आनंद निर्माण करणे , अंकांची ओळख होण्यासाठी , पुढचा , मधला , नंतरचा अंक कोणता या साठी या राखीचा उपयोग करता येतो.

मुलांच्या क्षमतेनुसार बेरीज वजाबाकी ही क्रिया पण घेता येते.

 तसेच दिव्यांग मुलांना वेगळी प्रेरणा देण्यासाठी या राखीचा उपयोग होऊ शकतो  ह्या  नाविन्यपूर्ण राख्या  तयार केल्यामुळे सारा पाटीलचे उरण तालुक्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले. 
 
 तसेच साराच्या शाळेच्या प्रशासनाने व शिक्षकांनी खूप खूप अभिनंदन केले आहे. राख्या दाखविताना सारा पाटीलच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकतो आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies