गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे गणपतीच्या एक दिवसा अगोदर स्वतः टोल नाक्यावर उपस्थित राहून नागरिकांची करत होते चौकशी .. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे गणपतीच्या एक दिवसा अगोदर स्वतः टोल नाक्यावर उपस्थित राहून नागरिकांची करत होते चौकशी ..


 गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे गणपतीच्या एक दिवसा अगोदर  स्वतः टोल नाक्यावर उपस्थित राहून नागरिकांची करत होते चौकशी ..

मिलिंद लोहार-सातारा


येथील आनेवाडी टोल नाक्यावर स्वतः गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई काही नागरिकांना थांबून चौकशी करताना दिसले गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या बद्दल संपूर्ण जिल्ह्याला अगोदरच माहिती आहे साधे सरळ राहणीमान व सामान्य जनते बद्दल असलेली आपुलकी यातून स्पष्ट होते गेल्या दोन दिवसापूर्वी गणेश भक्त येत आहेत प्रशासनाने सज्ज राहा असे ठणकावून सांगितले होते .सातारा, सांगली ,कोल्हापूर ,रायगड ,रत्नागिरी अशा विविध भागात मुंबई तसेच मुंबई उपनगरातून पुण्यातून गणेश भक्त येणार आहेत तरी प्रशासनाने सज्ज राहा असे सांगितले होते मात्र स्वतः ग्राउंड लेव्हल वर जाऊन म्हणजेच थेट आणेवाडी टोल नाका येथे जातील याची अपेक्षा कोणालाच नव्हती मात्र सर्वांनाच एक सुखद धक्का दिला . स्वतः चौकशीसाठी टोल नाक्यावर आले नागरिकांना येणाऱ्या अडचणी ते विचारत होते .मुंबईपासून ते आनेवाडी टोल नाक्या पर्यंत रस्त्याची बिकट अवस्था आणि कोण टोल मागतोय का अशा सर्व नाना प्रकारच्या गोष्टी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई विचारत होते उद्या गणपती असल्याने टोल नाक्यावर काय हाल चालू आहेत गाड्यांच्या किती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत गणेशभक्तांसाठी किती लाईन उपलब्ध केलेल्या आहेत तसेच टोल नाक्यावर कोणत्या प्रकारची वादावादी तर नाही चालू हे सर्व बघण्यासाठी खुद्द गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई गेले होते

No comments:

Post a Comment