साहेब फौंडेशनतर्फे रविवारपासून आरोग्य महोत्सवाचे आयोजन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

साहेब फौंडेशनतर्फे रविवारपासून आरोग्य महोत्सवाचे आयोजन

 साहेब फौंडेशनतर्फे रविवारपासून आरोग्य महोत्सवाचे आयोजनबेळगाव 
कोरोना संकट काळात विविध प्रकारचे उपक्रम हाती घेणाऱ्या साहेब फौंडेशनतर्फे गणेशोत्सव काळात आरोग्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उदघाटन रविवारी दुपारी 4 वाजता होणार आहे. 

नाथ पै सर्कल जवळील नेताजी सुभाष सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 23 ते 31 तारखेपर्यंत दुपारी 4 ते 8 या वेळेत नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. उदघाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ, पोलीस आयुक्त के त्यागराजन, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी, शहापुर विभाग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. आरोग्य महोत्सवाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन साहेब फौंडेशनच्या संचालिका उज्वला संभाजी पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment