श्री स्वामी समर्थ अॅक्वा निमणी ने दिला दिलासा . - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

श्री स्वामी समर्थ अॅक्वा निमणी ने दिला दिलासा .


श्री स्वामी समर्थ अॅक्वा निमणी ने दिला दिलासा .

सुधीर पाटील-सांगली

येळावी प्रादेशिक योजना बंद पडल्यापासून निमणी सह आठ ते नऊ गावाचा पाण्याचा प्रश्न भीषण बनला होता येळावी प्रादेशिक योजना बंद पडल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता .निमणी मध्ये  पिण्याचे पाणी  उपलब्ध नसल्याने नागरीकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता .एक किलो मीटर ते दोन किलोमीटरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत होते .या पाण्याच्या प्रश्नावर कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे . अशा परिस्थितीमध्ये निमणी येथील अजित विलासराव पवार यांनी स्वतःच्या जागेमध्ये श्री स्वामी समर्थ अॅक्वा निमणीच्या मार्फत नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याची भूमिका घेतली आहे . पाच रुपये मध्ये वीस लिटर पाणी देण्यात येत आहे . या उपक्रमामुळे निमणी व परिसरातील सर्व नागरिकांमधून याचे कौतुक आहे. तरी या नवीन सुरू झालेल्या श्री स्वामी समर्थ अॅक्वा निमणी चे उद्घघाटन निमणी सरपंच विजय पाटील व   पलुस तासगांव  सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर .डी. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी संतोष सावंत .संतोष पवार .निवास गाढवे आदी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment