कौलव येथे घरी साकारला भारतीय शेतकरी प्रबोधन देखावा. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

कौलव येथे घरी साकारला भारतीय शेतकरी प्रबोधन देखावा.

 कौलव येथे घरी साकारला भारतीय शेतकरी प्रबोधन देखावा.
निरंजन पाटील-

महाराष्ट्र मिरर टीम कोल्हापूर
गणेश उत्सव सर्वत्र भक्तीमय साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सची खबरदारी घेत तरुण मंडळे सुद्धा भक्तिरसात चिंब झाले आहेत.सार्वजनिक देखावे दृष्टीक्षेपास दुर्मिळ  झाले असले तरी कौलव येथील शेतकऱ्याने जगाचा पोशिंदा भारतीय शेतकरी राजा असा देखावा आपल्या घरी सजवला आहे.कृषिप्रधान संस्कृतीशी निगडित बैलगाडीतील आकर्षक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


राधानगरी तालुक्यातील कौलव येथील नेताजी तुकाराम पाटील या शेतकऱ्याने आपल्या घरी गणेश मूर्ती समोर आकर्षक देखावा सजविला आहे.प्रत्येक वर्षी विविध प्रकारचे देखावे सादर करणाऱ्या युवा शेतकरी नेताजी पाटील यांनी  आपल्या घरी "जगाचा पोशिंदा भारतीय शेतकरी राजा" हा देखावा सजवला आहे.शेतकरी रूपातील गजाननाची आकर्षक मूर्ती ,दणकट बैलगाडी शेतीकडे खंबीर पणाने चाललेला श्री गणेश अशी रचना केलेली आहे.कोरोनाला हरवून टाकायचं आहे.मनाने आणि शरीराने कणखर बना असा संदेश दिला आहे.उजव्या बाजूला विठ्ठलमूर्ती समोर  अश्व रिंगण सोहळा मधून सुरक्षित अंतर ठेवा असा संदेश दिला आहे.तर डाव्या बाजूला भजनी मंडळ मधून मास्क वापरा संदेश दिला आहे.नेताजी पाटील शेतकऱ्याने कोरोना पार्श्वभूमीवर केलेला नयनमनोहरी देखावा कौलव परिसरात लक्षवेधी ठरला आहे.शेतकऱ्याने साकारलेला कोरोना विषयीचा प्रबोधनात्मक देखावा कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्यांचे कणखर रूप दर्शवत आहे.नेताजी पाटील यांच्या घरी देखावा पाहण्यासाठी शेतकरी वर्ग उपस्थिती दर्शवत आहे.

No comments:

Post a Comment