प्रांत कार्यालयाचे "धान्यकिट" घरपोच वाटप - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 30, 2020

प्रांत कार्यालयाचे "धान्यकिट" घरपोच वाटप

 प्रांत कार्यालयाचे "धान्यकिट" घरपोच वाटप

 जांभुळवाडीतील  50 आदिवासी कुटुबांना वाडीत जाऊन केले वाटप

ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जतकर्जत खालापुर उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली परदेशी याच्या पुढाकाराने कर्जत तालुक्यातील गरज असलेल्या आदिवासी कूटुबांना धान्याची किट वाटपाची प्रक्रिया गतीमान झाली असुन तालुक्यातील जांभुळवाडी या कातकरी आदिवासी वाडीमध्ये घरपोच धान्यवाटप करण्यात आले .    कर्जतमधील दिशा केन्द्र या सामाजिक संस्थेने गरज असलेल्या आदिवासी कूटूबांना धान्य वाटपाची विनंती केली होती ,या विनंतीनुसार मूबंइ येथील निती गोयल ,यांच्या  लाला भगवानदास ट्रस्टच्या सहकार्याने कर्जत खालापुरच्या उपविभागीय महसुल आधिकारी वैशाली परदेशी यांनी धान्य किट उपलब्ध करून दिले व गरज असलेल्या कूटूबांना ते वाटप करण्यास सुरुवात केली .पहिल्या दिवसी तमनाथ कातकरवाडी ,बीड व खाणीचीवाडी कातकरवाडी येथील एकशे पन्नास कुटुंबाना धान्य वाटप केल्यानंतर जाभूळवाडी येथील पन्नास कूटूबांना घरपोच  धान्यवाटप करण्यात आले .   

पाच किलो गव्हाचे पिठ ,पाच किलो तांदुळ,दोन किलो डाळ ,एक किलो साखर ,एक किलो तेल ,साबण आदी वस्तू असलेल्या किटचे वाटप प्रातं कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी विशे,तलाठी खूशाल राठोड ,दिशा केन्द्रचे कार्यकर्ते रवी भोई ,सूशिला भोइ ,भालीवडीचे रेशन दूकानदार प्रल्हाद कार्ले आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment