नो पार्किंग झोन रद्द करण्याची मागणी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

नो पार्किंग झोन रद्द करण्याची मागणीनो पार्किंग झोन रद्द करण्याची मागणी


मिलिंद लोहार-सातारा

सातारा प्रांत अधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध सरकारी कार्यालयातून त्याठिकाणी जिल्ह्यातून नागरिक येतात मात्र कार्यालय परिसरात जप्त केलेली वाहने ,वाळूची योग्य व्यवस्था करून उभे केलेले पेव्हर ब्लॉक काढले तर वाहनांना जागा उपलब्ध होईल त्यामुळे नो पार्किंग झोन रद्द करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र पिंकू यांनी केला आहे 


याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सातारा प्रांताधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय आधी आहेत जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील नागरिकांनी या ठिकाणी कामानिमित्त यावे लागते. दूरवरून येणाऱ्या नागरिकांचे वाहन असते मात्र पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. नो पार्किंगमुळे नागरिकांना नाहक मानसिक आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कार्यालयासमोरील जप्त केलेली वाहने व वाळुची योग्य विल्हेवाट लावून परिसरातील अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे .उभे असलेले पेव्हर ब्लॉक काढावेत अशी मागणी करा आली आहे. कार्यालयाच्या आवारात वाहनांना प्रवेश दिला जात नसल्याने वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत तरी याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी पुढे करण्यात आलीय.

No comments:

Post a Comment