चंद्रकांत शिंगाडे यांची ऑल इंडिया धनगर महासंघ युवक आघाडीच्या कर्जत तालुका युवक अध्यक्षपदी निवड ; - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 17, 2020

चंद्रकांत शिंगाडे यांची ऑल इंडिया धनगर महासंघ युवक आघाडीच्या कर्जत तालुका युवक अध्यक्षपदी निवड ;

 चंद्रकांत शिंगाडे यांची   ऑल इंडिया धनगर महासंघ युवक आघाडीच्या कर्जत तालुका युवक अध्यक्षपदी निवड ; 

कर्जतमधील धनगर समाजात आनंदाचे वातावरण


नरेश कोळंबे-

महाराष्ट्र मिरर टीम

       

  

ऑल इंडिया धनगर महासंघ युवक आघाडीच्या कर्जत तालुका युवक अध्यक्षपदी चंद्रकांत जनार्दन शिंगाडे यांची निवड करण्यात आली आहे.ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शना खाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.


      धनगर महासंघातर्फे विविध ठिकाणी धनगर समाजाच्या विकासासाठी नवीन तरुणांची निवड करण्यात आली.यामध्ये खालापूर येथील तरुण ठकुराम झोरे तर कर्जत मधील जुम्मा पट्टी येथे राहणारे चंद्रकांत शिंगाडे या तरुणांची अनुक्रमे खालापूर व कर्जत तालुका युवक अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून आजवर संघटनेमार्फत समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात कायम  पाठीशी खंबीर पणे उभे राहण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून होत आलेले आहे.शिंगाडे हे उच्य शिक्षित असून त्यांच्याकडे कर्तृत्व- नेतृत्व -वक्तृत्व हे तीनही पैलू अंगीकृत असल्याने समाजात त्याची स्वतःची एक वेगळी  ओळख निर्माण झालेली आहे.समाजाप्रती  असलेली तळमळ,सामाजिक कार्यात असलेले योगदान तसेच समाज हितासाठी घेतलेली कठोर भूमिका त्यांच्या वडिलांचे समाज्यात असलेले स्थान पाहता संघटनेला प्रभावी बनवण्यासाठी लाभलेल्या युवा नेतृत्व म्हणून चंद्रकांत शिंगाडे यांच्या कडे पाहिले जात आहे.  शिंगाडे यांचे  या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment