Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातारा सांगली कोल्हापूर पुराचा धोका वाढला कोयनेतून विसर्ग सांगली जोरदार सरी वारणा क्षेत्रात अतिवृष्टी


पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ

सातारा सांगली कोल्हापूर  पुराचा धोका वाढला 
कोयनेतून विसर्ग सांगली जोरदार सरी वारणा क्षेत्रात अतिवृष्टी 


कृष्णा वारणेला पुराचा धोका 

मिलिंद लोहार-सातारा


सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून गेले दोन दिवस संततधार सुरु आहे सातारा सांगली कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण झाला असून एन डी आर एफ च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आले आहेत असे सूत्रांकडून समजले वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे .

कोयना आणि वारणा धरणाच्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाल्याने कृष्णा वारणा नद्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे सांगलीतील आयुर्विन ची पातळी रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत 27 फुटावर गेली होती जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली होती रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण सरासरी 23.1 62 मिमी पाऊस नोंदला गेला शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक म्हणजे 62 मिमी पावसाची नोंद झाली आहे इस्लामपूरमध्ये 38 कॉल उचला 15 तासगावला 21 सांगली 27 27 विटा ते वीस आटपाडी सात कवठेमहाकाळ पाच कडेगाव ला 34 मिमी पाऊस झाला वारणा धरण 90 टक्के तर कोयना धरण 80 टक्के भरले आहे रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कोयनेतून 35000 732 तर वारणा धरणातून 12984 क्युसेक विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा वारणा नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होत आहे दोन्ही नद्यांच्या काठावर सतर्कतेचा इशारा दिला आहे सांगलीतील आयुर्विन पुलाजवळील पाणीपातळी 25 फुटांवर केली असून तिच्या पोटावर गेल्या शहरातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे त्यादृष्टीने उपाययोजना सुरू झाले आहेत

कोयनेचा पाणी साठा 91 टीएमसी जवळ

सततच्या पावसामुळे कोयना धरणातील साठ्याला वाढ झाली त्यामुळे सकाळी अकराच्या सुमारास पाणीसाठा नव्वद पॉईंट 89 टीएमसी झाला होता तर विसर्ग वाढवून तो 35 हजार 732 क्‍युसेक वर पोचला होता सहा दरवाजे सहा फुटापर्यंत उघडण्यात आले रविवारी सकाळी अकराच्या सुमारास कोयना धरणात 19261 वेगाने पाणी येत होते त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा विजू गृहातून एकविसशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता तर धरणाचे सहा दरवाजे सहा फुटाने उचलण्यात आले होते या दरवाज्यातून 33632 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले


कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणातून विसर्ग वाढला असून नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे राधानगरी धरणाच्या चौथ्या स्वयंचलित दरवाजा दुपारी साडेतीन वाजता खुला झाला दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी सहा फुटांनी वाढली असली तरी गतवर्षी 16 ऑगस्ट पर्यंत च्या तुलनेत यंदा नऊ हजार 775 किलोमीटरने पाऊस कमी झाला आहेतसेच सातारा येथील वाई तालुक्यातून बलकवडी पाठोपाठ धोम धरणातून ही पाणी सोडले जांभळी बंधारा तुडुंब भरलेला कमंडलू नदीला पूर तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

त्याच प्रकारे संततधार पावसाने मानव नदीतील बंधारा ओव्हरफ्लो झाला मान नदी लागली वाहू

कराडमध्ये ही अशीच अवस्था पंढरपूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग पाण्यात वाहनधारक कसरत करताना संपूर्ण सातारा सांगली कोल्हापूर जिल्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे हे असाच पाऊस अजून चार ते पाच दिवस जर सलग चालू राहिला तर यापेक्षा ही परिस्थिती वाईट निर्माण होण्याची चिन्हे तयार झाली आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies