वरंध घाटात सरंक्षण भिंत कोसळली - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 18, 2020

वरंध घाटात सरंक्षण भिंत कोसळली

 वरंध घाटात सरंक्षण भिंत कोसळली,महाड -भोर मार्ग वाहतुकीसाठी बंद.

महाराष्ट्र मिरर टीम


महाड मार्गे भोर या पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या घाट रस्त्यातील वरंध घाटात सरंक्षण भिंत कोसळल्याने हा मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय संबंधीत विभागाने घेतला आहे.

13 ऑगस्ट रोजी या घाटात सरंक्षण भिंत पहिल्यांदा कोसळली होती त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी दोन ठिकाणी ही भिंत कोसळल्याने माती आणि दगड रस्त्यावर आल्याने हा मार्ग आता वाहतुकीकरिता बंद करण्यात आल्याचे समजते.

दरवर्षी या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च होत असताना हा खर्च जातो कुठे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे,हा मार्ग बंद झाल्याने गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या-येणाऱ्या भक्तांची डोकेदुखी वाढली आहे.


No comments:

Post a Comment