Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग रस्त्यांच्या दुरुस्ती कामांची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणीआगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग रस्त्यांच्या दुरुस्ती कामांची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी


महाराष्ट्र मिरर टीम -अलिबागआगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक चाकरमानी मुंबईहून कोकणातील आपल्या गावाकडे निघाले आहेत. या अनुषंगाने मुंबई-गोवा महामार्ग रस्त्याच्या दुरुस्ती कामांची आज पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी केली.

  यावेळी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड-शेंगुलवार, तहसिलदार अरुणा जाधव, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित अधिकारी, अभियंता, दयानंद भगत, उदय जवके, डी.बी.पाटील, माजी सभापती नरेश पाटील, परशुराम मोकल, चैताली पाटील हे उपस्थित होते.  

     पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुंबई गोवा वडखळ बायपास ते तरणखोप, कांदळेपाडा, रामवाडी-तरणखोप ब्रिज खाली या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्तीचे काम गणेशोत्सवापूर्वी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies