सांगलीत जिल्ह्यात पाण्याची वाढती पातळी -नागरिकांमध्ये भितीचे वातावरण - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 17, 2020

सांगलीत जिल्ह्यात पाण्याची वाढती पातळी -नागरिकांमध्ये भितीचे वातावरण


सांगलीत जिल्ह्यात पाण्याची वाढती पातळी -नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

सुधीर पाटील-सांगली

सांगली व सांगली जिल्ह्यातील काही पुल व बंधारे पाण्या खाली गेले आहेत.संततधार पडणारा पाऊस व पाण्याची वाढती पातळी यामुळे नदी पात्राच्या कडेला असलेल्या लोकांच्या मनात धास्ती बसली आहे .मागच्या वर्षी येऊन गेलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान या तून सावरतात ना तोच  आता लगेच पुर परिस्थिती ला सामोरे जावे लागत आहे .आता कृष्णा नदी ची पाणी पातळी ३३ फूटाच्या वर  आहे .या मुळे सांगली कर्नाल रस्त्या वर पाणी आले आहे .यामुळे नदी काटच्या  गावा मधील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे  .

यामध्ये कवठेपिरान ,खटाव मौजे डिग्रज ,कसबे डिग्रज , भिलवडी ,माळवाडी, आमणापूर मधील पूल पाण्या खाली गेला आहे तसेच औंदुंबर मधील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे तसेच भिलवडी येथील पूलावर पाणी येण्याची भिती निर्माण झाली आहे.अश्या अनेक नदीकाठच्या वाड्या वस्त्या पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे .

 

सूर्यवंशी वाडी येथे खासदार संजय काका पाटील यांनी भेट देऊन नागरिकांनी स्थलांतरित व्हावे असे आव्हान करण्यात आले यावेळी महानगर पालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील यांनी पालिकेने निवाऱ्याची सोय केली आहे . असे सांगितले तसेच नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये असेही  आव्हान करण्यात आले .

No comments:

Post a Comment