पुढील48 तासांमध्ये रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 17, 2020

पुढील48 तासांमध्ये रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस

 पुढील 48 तासांमध्ये रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस


प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून  प्राप्त संदेशानुसार  पुढील48 तासांमध्ये रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नदी परिसरातील, सखल व  दरडग्रस्त भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी व पोहण्यासाठी समुद्रात जावू नये. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. सर्व शासकीय विभागाचे अधिकारी यांनी कोणत्याही अपघात/आपत्ती प्रसंगी तत्काळ प्रतिसाद द्यावा व सतर्क रहावे.असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment