Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी उद्योजक हरिभाई पटेल यांची निवड

भारतीय जनता  पार्टीच्या  दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी उद्योजक हरिभाई पटेल यांची  निवड                               

जिल्ह्यात भाजपा वाढीसाठी प्रयत्न करणार : हरिभाई पटेल ओंकार रेळेकर-चिपळूण
 संगमेश्वर शहरातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते केंद्रीय मंत्री ना.सुरेश प्रभू यांचे विश्वासु सहकारी हरिभाई रामजी पटेल यांची भाजप पक्षातर्फे रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभाग जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे,

 हरिभाई पटेल हे १९९४ पासून  भारतीय जनता पार्टी मध्ये सक्रिय असून सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. भाजपा विषयी त्यांचे असणारे प्रेम पक्षवाढीसाठीची सुरू असलेली धडपड पाहून भाजपातर्फे आज पर्यंत त्याना विविध पदावर काम करण्याची संधी देऊन सन्मानित करण्यात आले आहे,आपला उद्योग व्यवसाय सांभाळून ते पक्षकार्यासाठी जास्तीत जास्त वेळ देतात संगमेश्वर शहर कोशाध्यक्ष,कार्यकारणी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य,राज्य कार्यकारणी सदस्य आदी महत्वाच्या पदावर हरिभाई पटेल यांनी काम केले आहे,
        पटेल यांची दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी  निवड माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे कोकण संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण व दक्षिण जिल्हाध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन यांनी नुकतीच जाहीर केली आहे.                                                    गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात आणि  भाजप पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत असतांना त्याच्या कामाची दखल घेऊन वरिष्ठांनी पटेल यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.                              
   
भाजप पक्षवाढीसाठी आपण पूर्वीपेक्षा अधिक जोमाने काम करून पक्षश्रेष्ठीनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावत प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही देऊन  कोकण विभाग भाजपा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र चव्हाण,आमदार प्रसाद लाड जिल्हाध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात भाजपा वाढीसाठी काम करणार असल्याचे हरिभाई पटेल यांनी सांगितले, या निवडीबद्दल  पटेल यांचे मित्रपरिवार आणि पक्षातील मंडळींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies