आता साताऱ्यात गृह विलगीकरण सुरु होणार जिल्हाधिकाऱ्यांकडून आज नियमावली जारी - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, August 3, 2020

आता साताऱ्यात गृह विलगीकरण सुरु होणार जिल्हाधिकाऱ्यांकडून आज नियमावली जारी


आता साताऱ्यात गृह विलगीकरण सुरु होणार  जिल्हाधिकाऱ्यांकडून आज नियमावली जारी

मिलिंद लोहार -सातारा
 कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बाधितांमध्ये अधिकाधिक नागरिक लक्षणे नसलेली  आहेत. अशा नागरिकांना इथून पुढे नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोय उपलब्ध असेल तर घरीच वेगळ्या खोलीत ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्याकडून अतिशय सूक्ष्म नियमावली सुरु करण्यात आली आहे.  
ही नियमावली तयार करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिक मजीद कच्छी व  त्यांच्या टीमने सामाजिक बांधलकीतून योगदान दिले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या सर्वांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे. 
ही नियमावली एक आदर्श नियमावली ठरेल याचा अतिशय चांगला परिणाम होईल. जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment