Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

उस्ताद बिस्मिल्ला खानउस्ताद बिस्मिल्ला खान


सुप्रसिद्ध सनईवादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा आज स्मृतीदिन  (२१ ऑगस्ट,२००६)यांचा जन्म बिहारी  कुटुंबामध्ये डुमराँव गावी झाला.त्यांचे आजोबा यांच्या जन्मानंतर म्हणाले "बिस्मिल्ला", म्हणजे सुरवात चांगली झाली,त्या मुळे पुढील काळात हेच नाव रूढ झाले. त्यांचे कुटुंब दरबारी राग वाजवण्यात वाकबगार होते. वडील डुमराँव संस्थानामध्ये सनई वादक होते. भोजपूरच्या संस्थानामध्ये ते त्याची कला सादर करायला जात असत.


वयाच्या सहाव्या वर्षी ते बनारस ला आले आणि काका अली बख्श 'विलायती यांच्याकडून सनई वाजवायला शिकू लागले.या काकांची नेमणूक विश्वनाथ मंदिरामध्ये सनई वादन करण्यासाठी केली होती.बिस्मिल्ला खान देखील मंदिरामध्ये सनई वाजवत असत , तसेच गंगाकिनारी तासनतास ते सनई वाजवत असत ,त्या बद्दल ते म्हणायचे "माझ्या सनई वादनाने गंगामाई माझ्यावर प्रसन्न होते.


त्यांनी अप्रतिम वादन कौशल्यामुळे सनईसारखे साथीला असणारे वाद्य त्यांनी मैफिलीचा मध्यभागी आणले. याची सुरवात १९३७ साली कोलकात्यातील ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स मधील त्यांच्या वादनाने झाली.


भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी १९४७ साली दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सनई वाजवण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला.२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले त्याही  वेळी त्यांनी लाल किल्यावर सनई वादन केले होते.  त्या नंतर दर वर्षी पंतप्रधानांचे भाषण झाल्यावर दिल्ली दूरदर्शन त्याच्या सनई वादनाचे थेट प्रक्षेपण करत असे. ही परंपरा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असे पर्यंत सुरु होती.


१९५९ साली आलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या गुंज उठी शहनाई या चित्रपटासाठी त्यांनी सनई वाजवली होती.

बिस्मिल्ला खान यांना दिल्लीला इंडिया गेट समोर बसून सैनिकांसाठी असलेल्या अमर जवान ज्योती पाशी सनई वाजवायची होती ती इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. लोकसभेमधे नव्याने बांधलेल्या "बालयोगी" दालनामध्ये, त्यांनी राष्ट्रपती झालेल्या ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ सनई वादन केले. ( २४ जुलै,२००२ )

वृद्धापकाळाने प्रकृती खालावल्या मुळे त्यांना वाराणसीच्या हेरिटेज हॉस्पिटल मध्ये भरती केले होते त्यातच त्यांना हृदयविकाराचा जोराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले (२१ ऑगस्ट ,२००६).


त्यांच्या पश्चात पाच मुली ,तीन मुलें आणि दत्तक घेतलेली मुलगी सोमा घोष आहेत .


भारतरत्न उस्ताद बिस्मिला खान याना शासकीय इतमामात शेवटचा निरोप  दिला गेला त्या मध्ये २१ तोफांची सलामी दिली गेली.संगीत नाटक अकादमीने त्यांच्या निधनानंतर २००७ सालापासून त्यांच्या स्मरणार्थ उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार द्यायला सुरवात केली.


२००१ साली आयुष्यातला सर्वोच पुरस्कार भारत रत्न त्यांना दिला गेला म्हणून त्यांना मिळालेल्या अन्य पुरस्कारांची यादी द्यायची गरजच नाही. भारत सरकारच्या टपाल खात्याने उस्तादजींच्या सन्मानार्थ २१ ऑगस्ट,२००८ रोजी ५ रुपयांचे तिकीट छापले होते.

त्यांचा ८० वा वाढदिवस न्यू यॉर्क च्या वर्ल्ड म्युझिक इन्सिट्यूट ने साजरा केला होता.


गुगलने त्यांच्या सन्मानार्थ डुडल बनवले होते.


बिस्मिल्ला खान यांनी शिष्य परंपरा निर्माण केली नाही, जे थोडेफार काही शिकवले ते फक्त त्यांच्या दोन मुलांना निझाम हुसेन आणि नय्यार हुसेन याना.

कोणत्याही मंगल कार्याची सुरवात सनईच्या सुराने होत असते त्या मुळे बिस्मिल्ला खान अमर झाले आणि शहनाई मात्र अनाथ झाली असे म्हणणे योग्य ठरेल..


बासरीवादक पंडित अरविंद गजेंद्रगडकर यांनी वेगवेगळ्या गायक वादकांवर *सुरसावल्या* नावाने सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या मध्ये  ते आकाशवाणी धारवाड केंद्रावर  संगीत विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना उस्तादजी कार्यक्रम करायला आले असतानाची आठवण लिहिली आहे.

आकाशवाणी केंद्राचा परिसर मोठा रम्य होता ,तो पाहून ते म्हणाले "हॉटेल वर जायला नको मी इथेच राहणार" म्हणून  नळाखाली उघडयावर मनसोक्त  अंघोळ केली आणि मटणाचा डबा  आणायला सांगताना म्हणाले "मी बनारसला कधीच मांसाहार करत नाही कारण काशी  विश्वेश्वराजवळ वाजवायचे असते ना " एवढे बोलून परावरच नमाज पढला आणि झाडाच्या सावलीत निवांत झोपले. त्या दिवशीचे वादन खूप रंगले होते


त्यांनी गुंज उठी शहनाई मध्ये *तेरे सूर और मेरे गीत* ह्या गाण्याच्या वेळी सनई वाजवली आहे.


त्यांनी वाजवलेला  मालकंस राग .कार्यक्रमाच्या जागी  ऐकू येतो.


प्रियांका ढम

लोणी काळभोर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies