महिलांनी हरतालिका व्रत पूजन उत्साहात केले साजरे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

महिलांनी हरतालिका व्रत पूजन उत्साहात केले साजरेमहिलांनी हरतालिका  व्रत पूजन उत्साहात केले साजरे


अखंड सौभाग्य रहावे यासाठी केले जाते व्रत .

प्रियांका ढम-लोणी काळभोर


भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत करण्यात येते. 'हर' हे भगवान शंकराचेच नाव आहे. शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते. 'हरी' हे भगवान विष्णूचे नाव आहे. हरतालिकेसंबंधी पौराणिक कथाही आहेत. पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते. कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झाले. या व्रतासाठी हरतालिका किवा हरितालिका दोन्ही शब्दांचा उपयोग करण्यात येतो. ग्रंथामध्येही दोन्ही शब्द आढळतात.


हरतालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे. शास्त्रात या व्रताबाबत 'हरित पापान सांसारिकान क्लेशाञ्च', अर्थात हे व्रत सर्वप्रकारचे दु:ख, कलह, व पापांपासून मुक्ती देते, असे म्हटले आहे. शिव-पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे. निर्जला एकादशीप्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास पाळण्यात येतो. पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते. पार्वतीच्या इच्छेची पूर्तीही याच दिवशी झाली होती.

 त्याला अनुसरूनच आज ही ही पूजा तेवढ्याच उत्साहाने साजरी केली जाते महिला वर्ग यासाठी उपवास करून हरतालिके ची पूजा मांडून मनोभावे प्रार्थना करतात आणि हे व्रत संपूर्ण सफल व्हावे यासाठी प्रयत्न करतात पाऊस आणि कोरोणा च्या काळात देखील महिलांचा तेवढाच उत्साह यावेळी देखील पहायला मिळाला आणि वेळ मिळाल्यामुळे आकर्षक अशा महिलांनी मांडली होती.

No comments:

Post a Comment