खासदार - आमदारांच्या दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

खासदार - आमदारांच्या दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप.

 खासदार - आमदारांच्या दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप.


राजेंद्र मर्दाने

महाराष्ट्र मिरर टीम चंद्रपूर  लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर तथा वरोरा - भद्रावती विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रतिभा  धानोरकर यांनी आपल्या वरोऱ्यातील निवासस्थानी गणपती बाप्पा प्रतिष्ठापना केली होती. कोरोना पाश्र्वभूमीवर गणपती उत्सव साधेपणाने साजरा होत असताना या गणेश भक्तांचा उत्साह मात्र कायम होता.  त्यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झाल्यानंतर सहकुटुंब धानोरकर परिवारानी मनोभावे गणेशाची पूजा करुन लाडक्या बाप्पाला दीड दिवस पूर्ण होताच घरच्या घरीच  भावपूर्ण  वातावरणात निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... बोलो गजानन महाराज की जय.. या घोषणा देत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी आपल्या बाप्पाला निरोप दिला.

          

  खासदार बाळूभाऊ धानोरकर दरवर्षी आपल्या घरी भक्तिभावाने गणपती बाप्पांची स्थापना करतात. दरवर्षी गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक सुद्धा काढण्यात येते.  ढोल - ताशे वाजवत, फटाके फोडत मिरवणुक काढल्या जात होती, मात्र यंदा  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या सर्वावर बंदी घातली. यंदा घाट / तलावावर विसर्जन करता येणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आपला उत्साह कायम ठेवत खासदार - आमदारांनी दीड दिवसांच्या गणरायाला साधेपणाने निरोप दिला आहे.

      गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी कुणी बाप्पासोबत फोटो काढला तर कुणी सेल्फी घेतली आणि त्यानंतर जलकुंडात गणेश मुर्तींचे विसर्जन करून गणरायाचा निरोप घेतला.

         कोरोना संकटाच्या काळात जनतेने स्वत:ची व मित्र परिवारांची काळजी घेऊनच सण साजरा करावा. श्री गजाननाच्या आशीर्वादाने संपूर्ण देश लवकरच कोरोना विघ्नातून मुक्त होईल, असा विश्र्वास खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment