Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाड इमारत दुर्घटना कर्जतच्या रक्षा सामाजिक विकास मंडळाचा सक्रिय सहभाग


                   महाड इमारत दुर्घटना

कर्जतच्या रक्षा सामाजिक विकास मंडळाचा सक्रिय सहभाग

ज्ञानेश्वर बागडे/दिनेश हरपुडे
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत

 24 ऑगस्ट 2020 रोजी महाड शहरातील तारीख गार्डन ही पाच मजली इमारत पत्याच्या इमारती सारखी कोसळली. महाड शहरातील इमारत कोसळल्याचे कळताच कर्जत तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार राठोड यांनी ही माहिती कर्जत मधील रक्षा सामाजिक विकास मंडळच्या कार्यकर्त्यांना दिली. 


महाड शहरामध्ये इमारत कोसळल्याचे कळतात संस्थेचे सक्रिय सदस्य अमित गुरव ,सुमित गुरव ,अक्षय गुप्ता ,प्रखर गुप्ता आणि प्रसाद गिरी तातडीने महाडकडे रवाना झाले. कर्जत तालुक्याचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी मार्गदर्शन केले प्रमाणे, अमित गुरव हे महाडचे तहसीलदार  सुरेश काशीद आणि नायब तहसीलदार अरविंद गेमुड यांच्या संपर्कात राहिले. कर्जत, पाली, वाकण फाटा, माणगाव मार्गे मध्यरात्री   १ वाजून 10 मिनिटांनी महाड येथे पोहोचले. महाडमध्ये पोहोचल्यानंतर गुरव यांनी तहसीलदार यांच्याबरोबर फोनवरून संपर्क साधून, पुढील शोध आणि बचाव कार्याची माहिती जाणून घेतली. 


पुण्यावरून Ndrf तुकड्यांच आगमनही साधारण याच वेळेस झाले. NDRF सोबत इतर साहित्य साधनां सोबत डॉग स्कॉड ही सोबत होते. डॉग स्कॉड ने पाहणी केल्यानंतर तहसीलदार व नायब तहसीलदार आणि एनडीआरएफ यांनी शोध आणि बचाव मोहिमेची आखणी केल्यानुसार रक्षा सामाजिक विकास मंडळ ते पाच जवान 25 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत सक्रिय कार्यरत होते. यामध्ये या इमारतीचा ढिगारा मधून जवळ जवळ  18 तासानंतर एका लहान मुलाला जिवंतपणे बाहेर काढण्यात यश मिळाले, यासोबतच त्यांनी, पडलेल्या बिल्डिंगचा मलबा काढणे, हे काढत असताना जेसीबीला मार्गदर्शन करणे, त्यांना योग्य त्या ठिकाणी खणण्यास दिशा दाखवणे, मलबा काढत असताना तेथे राहणाऱ्या नागरिकांच्या काही मौल्यवान वस्तू, याच बरोबर इमारतीचा मलबा मध्ये आढळलेली महत्त्वाची कागदपत्रे आढळल्यास त्या प्रशासनाच्या हवाली करणे. इत्यादी अतिशय मोलाचे सहकार्य केले. 

या कोसळलेल्या इमारतीचा मलबा हटवणे, शोध आणि बचाव मोहिमेच्या कार्यात माननीय रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, अलिबागचे तहसीलदार विशाल दौंडकर ,महाडचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांचे आणि इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies