स्वाभिमानी शेतकरीसंघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन - खासदार राजू शेट्टी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

स्वाभिमानी शेतकरीसंघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन - खासदार राजू शेट्टी


स्वाभिमानी शेतकरीसंघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास  उग्र 
आंदोलन - खासदार राजू शेट्टी

मिलिंद लोहार-

महाराष्ट्र मिरर टीम सातारा

सातारा शहराचा बॉम्बे रेस्टॉरंट  चौक ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला दुधाला प्रति लिटर पाच रुपये दरवाढ देण्यात यावी दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी माफ करावा आणि  दूध पावडर निर्यातीला अनुदान देण्यात यावे या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या या मोर्चामध्ये  गाय आणि बैलगाडी यांचाही समावेश करण्यात आला होता मागण्या मान्य झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे .


केंद्र आणि राज्य सरकार  यांनी लॉक डाऊन जाहीर केलं आणि या सगळ्याचा परिणाम हॉटेल बंद पडले  मिठाईचे दुकान बंद पडली आइस्क्रीम पार्लर बंद पडले जेवणावर या बंद पडल्या आणि या सर्वाचा परिणाम म्हणून दुधाचा 40 टक्‍क्‍यांनी खप कमी झाला त्यामुळे दूध अतिरिक्त व्हायला लागलं  त्याचे भाव पडलेले आहेत त्यामुळे आता आमचा काही दोष नाही अशा परिस्थितीमध्ये सरकारने पुढे आले पाहिजे अतिरिक्त दुधामुळे दूध भूक्ती तयार झाली आहे ती सबसिडी देऊन देशाबाहेर घालवली पाहिजे ज्यादा उत्पादनाचा काळ महिनाभरात सुरू होतोय म्हणजे अजून दुधाच्या उत्पादनाचा भार वाढणार आहे त्याअगोदर दोन स्टॉक काढायला हवा त्यासाठी काही केंद्र सरकारने सबसिडी देणे गरजेचे आहे सामान्य माणसाची खरेदी करण्याची क्षमता संपलेली आहे म्हणून दुग्धजन्य पदार्थ तुपापासून आम्रखंड पर्यंत यावरील जीएसटी मागे घेतला पाहिजे जेणेकरून किमती कमी होतील आणि ग्राहक खरेदी करतील असे यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले .


यावेळी बोलताना पुढे म्हणाले की सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत तातडीची उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने लिटरला पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर कुणाचेही मध्यस्थी विना जमा करावेत राज्यामध्ये एकूण 46 लाख  दूध उत्पादक शेतकरी आहेत म्हणजे चाळीस लाख दूध उत्पादक शेतकरी परिवारांना याचा लाभ होणार आहे जर लवकरच निर्णय घेतला नाही तर आम्ही शांत बसणार नाही आजी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत क ही मोर्चाची मालिका संपल्यानंतर निर्णायक  लढ्याला सुरुवात होणार आहे ही आमची पोकळ धमकी नाही आम्ही 2007 ला करून दाखवलं 2018 ला हे करून दाखवलं त्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करणार आहोत असे यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले

No comments:

Post a Comment