निमणी ते तासगांव रस्त्याची दयनीय अवस्था,प्रशासनाची अर्थपूर्ण डोळेझाक... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 18, 2020

निमणी ते तासगांव रस्त्याची दयनीय अवस्था,प्रशासनाची अर्थपूर्ण डोळेझाक...

 निमणी ते तासगांव रस्त्याची दयनीय अवस्था,प्रशासनाची अर्थपूर्ण डोळेझाक...

 सुधीर पाटील -सांगली


निमणी ते तासगांव रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरु केल्याने या रस्त्याची दुरावस्था झालेली पाहावयास मिळते.रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता आहे हा इथल्या वाहन चालकांना पडलेला प्रश्न आहे.या  रस्त्याची चाळण झाली असून या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी याबाबत गांधारीची भुमिका घेतलेली दिसून येते.कंत्राटदारची पाठराखण करण्यात गुंग झालेले दिसतात. प्रशासन कंत्राटदाराच्या दावणीला बांधले आहेत की काय हा प्रश्न सामान्य लोकांना पडलेला असुन प्रशासनाने  ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. तासगांव रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे परंतु या भोंगळ कारभाराने जनतेमध्ये संतापाची लाट आहे. पलुस ते तासगांव या दोन गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. घाईघाईने चाललेल्या कामाबाबत लोकांच्या मनात असंतोष असुन प्रशासनाने त्याचा विस्फोट होण्याची वाट पाहु नये.असे जनतेतून बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment