रक्तदान करा रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांचे आवाहन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

रक्तदान करा रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांचे आवाहन
रक्तदान करा रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांचे आवाहन

ज्ञानेश्वर बागडे

महाराष्ट्र मिरर टीमकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. ८४ व्या वर्षात पदार्पण करत असलेले   सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जत.(कपालेश्वर मंदिर, टिळक चौक, कर्जत) अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेची परंपरा जोपासत आहे. लाॅकडाऊन काळात मंडळाने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी ९ मे २०२० रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्याला आपण चांगला प्रतिसाद दिला. 


पुन्हा एकदा गणेशोत्सव काळात शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२० रोजी  मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केले असून पुन्हा एकदा आपण सहकार्य करावे असे  आवाहन राजाभाऊ कोठारी यांनी केले आहे.


यासाठी आपणास पूर्व नोंदणी करणे अत्यावश्यक  आहे. किमान ५० रक्तदाते झाले तरंच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल.


पूर्व नोंदणी साठी संपर्क


अभिजीत मराठे  9823859701

रोनक कोठारी  9423838327

निलेश ऊर्फ बाली परदेशी  9373824303

No comments:

Post a Comment