Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आटपाडीच्या निवास पाटील यांना राष्ट्रीय मानव अधिकार संघटन, दिल्ली चा पुरस्कार !

 आटपाडीच्या  निवास पाटील यांना राष्ट्रीय मानव अधिकार संघटन, दिल्ली चा पुरस्कार !

      महाराष्ट्र मिरर टीम-आडपाटी


     सुमारे पाच ते सहा महिन्यांपासून जगभरासह देशांत कोरोना ने थैमान घातले असून लाॅकडाऊनचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे मध्यमवर्गीय , गोरगरीबांचे तर हाल होतंच आहेत त्याचबरोबर बहुविकलांग दिव्यांगांचे जगणेच मुश्कील झाले आहे. कोरोनाबाबत समाजात सोशल मिडिया माध्यमांतून अनेक गैरसमज व भिती पसरलेली असल्यामुळे 

ज्यांच्या जीवनात अगोदरपासूनच अंधकार आहे असे कित्येक बहुविकलांग घरातून बाहेर पडले नाहीत. अशा दिव्यांगावर  उपासमारीची वेळ येत आहे हे लक्षात घेत कायद्याचा अभ्यास चालू असणाऱ्या व स्वतः दिव्यांग असणाऱ्या श्री निवास पाटील यांनी तळमळीने अशा दिव्यांगांपर्यंत शक्य त्या प्रकारची मदत पोहोचवण्याचे काम चालू केले. दिव्यांगाविषयी त्यांची तळमळ व अभ्यास त्यातूनच जिल्हास्तरीय दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सहाय्य कक्ष सांगलीच्या सदस्यपदी निवड झाली. याचं जबाबदारी सोनं करून जास्तीत जास्त दिव्यांगांच्या पर्यंत मदत पोचवण्याचे निवास पाटील यांनी ठरवले.  यासाठी विविध वर्तमानपत्रे, सोशल मीडिया यांचे माध्यमातून आटपाडी तालुक्यात प्रथमच दिव्यांगांच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात आवाज उठविला. निस्वार्थीपणे दिव्यांगांचे प्रश्न समाजासमोर मांडल्यामुळे विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती अशा विविध स्तरातून त्यांना साथ मिळाली.  त्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी घरोघरी जाऊन दिव्यांगांपर्यंत मदत पोहचवण्याचे कार्य अवितरत दिवसरात्र चालू ठेवले.

लाॅकडाऊनपासून सुमारे ४५०-५०० ते दिव्यांगापर्यंत पोहचवण्याचे काम दिवस-रात्र चालू ठेवले. किराणा, अन्नधान्य, मास्क यांचे वाटप करतं प्रशासनामार्फत मदत मिळावी म्हणून मा. कलेक्टर व मा. तहसिलदार आटपाडी, पुरवठा विभाग आटपाडी यांना वेळोवेळी प्रहार संघटनेतर्फे अनेक निवेदने दिली. जिल्हास्तरीय दिव्यांग सहाय्य कक्ष पंचायत समिती अंतर्गत जवळपास पाच महिने निस्वार्थीपणे, उत्कृष्ट प्रकारे कार्य चालू आहे या सर्वांची दखल घेत या ७५ व्या स्वतंत्र्यदिनाचे औचित्य साधत *राष्ट्रीय मानव अधिकार संघटना, दिल्ली * यांनी श्री निवास पाटील यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित केले.  राष्ट्रीय मानव अधिकार संघटन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री संजय पाटील साहेब, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्य श्री. सुरेन्द्र पन्हाळकर तसेच विजय मोरे, संभाजी जगदाळे यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग वापर करत कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे पार पडला. 

याबरोबरच *सी. एन. आय. महाराष्ट्र न्यूज चैनेल चा दिव्यांगयोध्दा* त्याच बरोबर *सी. बी. एस्.  न्यूज चा कोरोना योध्दा* व *क्रांतीसूर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांनी कोरोना योध्दा* म्हणून गौरव केला आहे. या सर्व पुरस्कारांनी गौरव करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानत त्याची प्रसिद्धी करत न बसता श्री. निवास पाटील पुन्हा दिव्यांगांना प्रशासकीय मदत मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत.  त्यांची ही प्रतीक्षा ही लवकरच संपेल अशी समाजातून मते येत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies