तुळशी जलाशयावर पाण्याच्या विसर्गावर विद्युत रोषणाई. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 17, 2020

तुळशी जलाशयावर पाण्याच्या विसर्गावर विद्युत रोषणाई.

 तुळशी जलाशयावर पाण्याच्या विसर्गावर विद्युत रोषणाई.


निरंजन पाटील-राधानगरी


राधानगरी तालुक्यातील धामोड येथील तुळशी जलाशय तुडुंब  भरला आहे. संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी जलाशयाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच तुळशी जलाशयावर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नयनमनोहर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पाण्याच्या विसर्गावर तिरंगा ध्वजाच्या रंगछटाचे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. अतिदुर्गम भागातील धामोड येथील तुळशी जलाशयावर अलमटी धरण प्रमाणे केलेली विद्युत रोषणाई तुळशी, धामणी, म्हासुर्ली परिसरातील जनतेला सुखद अनुभव मिळणारी ठरत आहे.धामोड येथील तुळशी जलाशय ३.४७ टी.एम.सी.पाणी संचय असलेला तलाव निर्मितीसाठी माजी मंत्री स्वर्गीय रत्नापा कुंभार,माजी आमदार गोविंदराव कलिकते,खामकर गुरुजी,आण्णासाहेब नवणे यांनी विशेष प्रयत्न केले होते.या तालावामुळे शेती सिंचनानाबरोबर इचलकरंजी शहरासाठी राखीव पाणी साठा याच जलाशयात संचय केला जातो.या तलावामुळे राधानगरी ,करवीर तालुक्यातील बीड पर्यंत सुमारे नऊ हजार हेक्टर ओलिताखाली आले आहे.प्रतिवर्षी तुळशी जलाशय पूर्ण क्षमतेने भरतो कि नाही या विषयी संशकता व्यक्त केली जात होती पण लोंढा नाला प्रकल्प केळोशी तलावातील पाणी तुळशी जलाशयात सोडण्यात आल्याने तुळशी तलाव भरण्यास उपयुक्तता ठरली.त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे तुळशी जलाशयात पंच्यांनवं  टक्के पाणीसाठा झाला आहे.तलावाच्या सांडव्यावरील वक्र तीन दरवाज्यतून साडे तीनशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत तुळशी जलाशयातील पाण्याचा विसर्ग आमदार प्रकाश अबिटकर ,अधिक्षक अभियंता सुर्वे यांच्या हस्ते तुळशी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.निसर्गाच्या पाण्यावर भारतीय तिरंगा विद्युत रोषणाई द्वारे साकारण्यात आला हे दृश्य पाहून उपस्थितांनी जल्लोष केला.तर संजय पाटील येळवडेकर आणि संभाजीराव पाटील कौलवकर यांनी फटाक्यांची रंगी बेरंगी आतषबाजी करून जलाशय परिसराला चैतन्य निर्माण केले.उपस्थित नागरिकांनी पाण्याच्या विसर्गावरील रंग छटा अनुभवत स्वातंत्र्यदिनाचा आगळावेगळा अनुभव घेतला.कोल्हापूर जिल्ह्यात आणि तुळशी जलाशयावर प्रथमच पाण्याच्या निसर्गावर नायनमनोहरी विद्युत रोषणाई चा उपक्रम 


शाखा अभियंता विजयराव आंबोळे व त्यांच्या विभागाच्या कर्मचारी वर्गाने केल्याबद्धल सर्वांचे कौतुक केले जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जलाशयावर प्रथमच विद्युत रोषणाई  हा देशाभिमान दर्शवणारा उपक्रम असल्याचे अधीक्षक अभियंता सुर्वे यांनी सांगितले.


धामोड येथील तुळशी जलाशय निर्मितीपासून सत्तावीस वेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे.जलाशयावर करण्यात आलेली रोषणाई तलावाचे सुशोभीकरण आणि सौन्दर्यात  भर घालत आहे.आणखी दोन दिवस पाण्याच्या विसर्गावरील रंग छटेची अनुभूती घेता येणार आहे

No comments:

Post a Comment