निमित्त कोरोना ; फसला दरोडा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, August 29, 2020

निमित्त कोरोना ; फसला दरोडा

निमित्त कोरोना ; 
फसला दरोडा


                  महाराष्ट्र मिरर टीम-सातारा
कोरोनाची माहिती द्या ! आम्ही वैद्यकीय पथकातून आले आहोत असे सांगून घरात दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांचा प्रयत्न फसला यावरून घटनास्थळावरून माहिती मिळालेली अशी दिनांक 28 ऑगस्ट रोजी सातारा येथील रविवार पेठ येथील निवृत्त आरटीओ अधिकारी श्रीकांत बिलम पल्ली यांच्या दाराची बेल वाजवत एक महिला व एक पुरुष यांनी आमचा कोरोना सर्वे चालू आहे असे सांगून घरात प्रवेश मिळवला माहिती सांगत असताना दरवाजा उघडा होता दरम्यान त्यांचे इतर दोन साथीदार घरात घुसले त्यांनी बिलम पल्ली यांना घरातील कोचवर पाडून गळ्यातील चेन खेचून घेण्याचा प्रयत्न केला .त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बिलम पल्ली यांच्या पत्नी किचनमधून बाहेर आल्या व त्यांनी आरडाओरडा चालू केला आरडाओरडा सुरू असताना दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना रविवार पेठेतील लोकांनी त्यांना बघितले व त्यांना पकडून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले दरम्यान या टोळीमध्ये तीन पुरुष व एक महिला असल्याचे सांगितले जाते घटनास्थळावरून एका साथीदाराने पलायन केले पोलिसांनी घटनास्थळाची रेखी करून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे त्यांच्याजवळ एक रिव्हॉल्व्हर फोर व्हीलर  ताब्यात घेण्यात आली आहे .अधिक तपास सातारा शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सह पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम करीत आहेत

No comments:

Post a Comment