मंदीर उघडण्यासाठी चिपळूण भाजपकडून कौंढरताम्हाणे येथे घंटानाद आंदोलन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, August 29, 2020

मंदीर उघडण्यासाठी चिपळूण भाजपकडून कौंढरताम्हाणे येथे घंटानाद आंदोलन

 मंदीर उघडण्यासाठी चिपळूण भाजपकडून कौंढरताम्हाणे येथे  घंटानाद आंदोलन  


ओंकार रेळेकर -चिपळूण
राज्यभरात भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येत असून चिपळूण तालुक्यातील कौंढरताम्हाणे येथील श्री दत्त मंदिरात भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर  यांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन करण्यात आले.

कोरोना संक्रमण काळात 22 मार्चपासून राज्यातील सर्व मंदिर बंद आहे. हे मंदिर पुन्हा सुरू करावी यासाठी हा घंटानाद आंदोलना भाजपने केले आहे. जैन धर्मियांचे मंदिर सुप्रीमकोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा सुरू झाले आहेत. तर मग आमची मंदिरे का सुरू होत नाहीत. असा सवालही भाजपकडून करण्यात येत आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला इतर सर्व बाबतीत वेळ आहे. मात्र हिंदूंच्या असलेल्या देवतांचा मंदिराबद्दल उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यासाठी भाजपच्या वतीने आज राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्या घंटानाद आंदोलनानंतर महाविकास आघाडी सरकारला जाग येऊन हे सरकार आता तरी मंदिराचे दार उघडणार का ?असाच प्रश्न आता सर्वसामान्य म्हणून विचारला जात आहे. या घंटानाद आंदोलनासाठी मुंबई कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोहर इंदुलकर, अमोल रावणग, सदा ओक, सतीश इंदुलकर, प्रथमेश भोबसकर, जयंत पेजले, संजय जाधव, राजेश जाधव, जयेश भोबसकर, अप्पा खेतले, रामा आंग्रे, राकेश आंग्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment