Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची बैठक संपन्न


अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची बैठक संपन्न


अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येथील यासंदर्भात कुलगुरूंची समिती गठीत

                          उदय सामंत यांची माहिती

महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई, 



 विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेऊन  सहज, आणि सुलभ पध्दतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता  येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले.


आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात  झूमच्या माध्यमातून 13 अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत ऑनलाईन बैठक संपन्न झाली.



 सामंत म्हणाले, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा एका समान पद्धतीने घेता येतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठानी  एका समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याचे नियोजन करावे तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेणे शक्य आहे का? याबद्दलही विचार करावा अशा सूचना श्री. सामंत यांनी दिल्या.



सामंत म्हणाले,विद्यार्थ्यांची परिक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन   कमीत कमी संसाधनामध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षाकशा  घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी आज कुलगुरूची एक समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर 

उद्या दिनांक ३० ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता बैठक  घेऊन आपला अहवाल सादर करावा. समितीच्या निर्णयानंतर मा.राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही  सामंत यांनी सांगितले बैठकीत गोवा, दिल्ली,मध्यप्रदेश,बनारस विद्यापीठ यांनी कशा पद्धतीने तेथील परीक्षा घेतल्या आहेत, याचाही सविस्तर आढावा  घेण्यात आला. 

 या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,  विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ,सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी सहभागी होत


राज्यातील कोविड-१९चा प्रादुर्भाव आणि  अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात बैठक संपन्न

 

राज्यातील कोविड-१९चा प्रादुर्भाव आणि

विद्यपीठ अनुदान आयोगाने(UGC) दिलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार परिक्षेसंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली.

 बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,  विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ,माजी कुलगुरू राजन वेळूकर,विजय खोले, उपस्थित होते.

बैठकीत विद्यपीठ अनुदान आयोगाने(UGC) अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात  दिलेल्या मार्गदर्शन सूचना,सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूनी बैठकीत दिलेल्या सूचना, राज्यातील कोविड-१९चा प्रादुर्भाव आणि विद्यार्थी, पालक यांच्या परीक्षेसंदर्भातील सूचना,निकालाची प्रक्रिया, शैक्षणिक वर्ष  या सर्व बाबीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies